• Home
  • देश
  • चिन-अमेरिकेत तणाव‌ वाढणार? चिनी आयातींवर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा
Top News

चिन-अमेरिकेत तणाव‌ वाढणार? चिनी आयातींवर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा

चाणक्य नीति नुसार जाणून घ्या मुलगा आणि वडील यांच्यातील संबंध कसे पाहिजे 5

वॉशिंग्टन : चीननं दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या (रेअर अर्थ मिनरल्स) निर्यातीवर प्रतिबंध वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. अशा स्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनविरोधात नवीन व्यापार उपाययोजना जाहीर केली आहे. त्यांनी 1 नोव्हेंबरपासून सर्व चिनी आयातींवर 100 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची आणि अमेरिका निर्मित महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर कठोर निर्यात नियंत्रण लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील तणाव वाढवू शकतो.

चिनवर 100 टक्के टॅरिफ :

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराच्या बाबतीत बीजिंगनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप केला आणि इशारा दिला की, अमेरिका देखील त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर देईल. ट्रम्प यांनी घोषणा करताना म्हटलं, “1 नोव्हेंबर 2025 पासून किंवा त्याआधी, चीनच्या पुढील कृती किंवा बदलांवर अवलंबून, अमेरिका चीनवर 100 टक्के कर लादेल.”

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय एका अहवालानंतर घेण्यात आला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की, चीन जवळपास प्रत्येक उत्पादनावर व्यापक निर्यात प्रतिबंध लावण्याची योजना आखत आहे. त्यांनी हे इतर देशांशी व्यवहार करताना एक नैतिक अपमान असल्याचं सांगितलं आहे. ट्रम्प यांनी लिहिले, “अलीकडेच समजले आहे की चीननं व्यापाराच्या बाबतीत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा परिणाम कोणत्याही अपवादाशिवाय सर्व देशांवर होणार आहे. सोबतच हेदेखील स्पष्ट आहे की, ही योजना त्यांनी वर्षभरापूर्वीच तयार केली होती. मी फक्त अमेरिकेचीच गोष्ट करत आहे, त्या देशांची नाही ज्यांना यासारखा धोका होता. आम्ही 1 नोव्हेंबरपासून सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर निर्यात नियंत्रण लावणार आहोत.”

तज्ञांच्या मतानुसार, जर हे पाऊल अंमलात आणलं गेलं, तर त्याचा परिणाम ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या क्षेत्रांवर होऊ शकतो, जे आधीच सध्या आकारलेल्या टॅरिफच्या दबावाखाली आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापार युद्धानंतर वॉशिंग्टननं उचललेलं हे सर्वात कठोर संरक्षणवादी पावलांपैकी एक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts