• Home
  • देश
  • ट्विशा शर्मा प्रकरणात मोठा ट्विस्ट! पती अजूनही फरार; 10 हजारांचे बक्षीस जाहीर, घटनेच्या दिवशी काय घडलं?
Top News

ट्विशा शर्मा प्रकरणात मोठा ट्विस्ट! पती अजूनही फरार; 10 हजारांचे बक्षीस जाहीर, घटनेच्या दिवशी काय घडलं?

Twisha Sharma Case

Twisha Sharma Case: भोपालमधील ट्विशा शर्मा यांच्या संशयास्पद मृत्य प्रकरणाचा तपास सुरू असून, पती समर्थ सिंह अजूनही फरार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी सहा विशेष तपास पथके कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ सिंहाचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच तपास अधिक वेगाने करण्यासाठी आणखी पथके वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मृत्यूच्या दिवशी काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी ट्विशा शर्मा यांचा मृत्यू झाला.

दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान त्या पार्लरला गेल्या होत्या
घरी परतल्यानंतर त्यांनी पतीसोबत टीव्ही पाहिला
रात्री 9.45 पर्यंत दोघांनी एकत्र जेवण केले
त्यानंतर दोघे स्वतंत्र खोल्यांमध्ये गेले
रात्री 10.05 वाजता ट्विशाने आईला फोन करून “मी अडचणीत आहे” असे सांगितले
त्यानंतर आईने सासूला संपर्क साधला
सासू तपासणीसाठी गेली असता ट्विशा खोलीत आढळली नाही
घराच्या वरच्या मजल्यावर आणि शेडमध्ये शोध घेतल्यानंतर ती फाशीला लटकलेल्या अवस्थेत सापडली
रात्री 10.20 वाजता तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला
लग्नाची पार्श्वभूमी

डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख

ट्विशा शर्मा आणि समर्थ सिंह यांचे लग्न 12 डिसेंबर 2025 रोजी झाले होते. दोघांची ओळख डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. लग्नानंतर ट्विशा पतीसोबत भोपालमध्ये राहत होती.

दरम्यान, या प्रकरणावरून कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांचा तपास सुरू असून समर्थ सिंह अद्याप फरार आहे आणि तो परदेशात पळून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts