Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • सौदी अरेबियात बसचा भयंकर अपघात; 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू
Top News

सौदी अरेबियात बसचा भयंकर अपघात; 40 हून अधिक भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली : सौदी अरेबियात एक भिषण अपघात झाला. या अपघातात 40 हून अधिक भारतीय यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी बहुतेक हैदराबादचे यात्रेकरु होते. मक्काहून मदीनाला जाणारी प्रवासी बस डिझेल टँकरला धडकल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुफरीहाट परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर आपत्कालीन पथकं मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी व्यक्त केलं दुःख :

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सौदी अरेबियात झालेल्या दुःखद अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. मक्काहून मदीनाला जात असताना हा अपघात झाला आणि हैदराबादमधील रहिवासी देखील यात सामील असल्याचं प्राथमिक वृत्त समोर येताच मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना संपूर्ण माहिती मिळवण्याचे निर्देश दिले. तसंच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सौदी अरेबियातील अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितलं की रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. ते म्हणाले, “सौदी अरेबियातील मदीना इथं झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघातामुळं आम्हाला खूप दुःख झाले आहे. रियाधमधील आमचं दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातात बाधित झालेल्या भारतीय नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत. आम्ही शोकाकुल कुटुंबांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्याच्या प्रार्थनेत आम्ही प्रार्थना करतो.”

 

बसला आग लागली :

बसमधील सर्व भारतीय प्रवासी उमराह यात्रा पूर्ण करुन मदीनाला परतत होते. बाजूनं येणाऱ्या एका डिझेल टँकरनं बसला धडक दिली तेव्हा त्यापैकी बहुतेक जण झोपेत होते. धडक इतकी तीव्र होती की बसचं मोठं नुकसान झालं आणि त्याला आग लागली. सौदी बचाव पथकं तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केलं. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियातील मदीनाजवळ भारतीय उमराह यात्रेकरुंशी झालेल्या दुःखद बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर, जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासानं एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. मक्का-मदीना महामार्ग हा उमराह आणि हज यात्रेकरूंसाठी सर्वात व्यस्त मार्ग आहे. दरवर्षी हजारो भारतीय या मार्गानं प्रवास करतात.

 

यापूर्वीही झाले अपघात :

सौदी अरेबियामध्ये यापूर्वीही अशाच प्रकारचे अपघात झाले आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. 2023 मध्ये अशाच एका अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता. मक्का-मदिना महामार्गावर वाहतूक जास्त असते, ज्यामुळं अनेकदा अपघात होतात.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts