Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात; तरीही पोहोचली नियोजित कार्यक्रमात
मनोरंजन

अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात; तरीही पोहोचली नियोजित कार्यक्रमात

Actress Nora Fatehi arriving at an event despite being injured in an accident

Nora Fatehi accident : नोरा फतेही ही नेहमीच तिच्या अदा, तिच्या डान्स आणि डान्सिंग स्टेप्समुळे चर्चेत असते. परंतु तिचा मुंबई येथे भीषण अपघात झाल्याची चर्चा सुरु आहे. तिचा अपघात एका कार्यक्रमाला जाण्यापूर्वी झाला. मध्यधुंध अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने तिच्या कारला धडक दिली. यामुळे नोरा फतेही ची कार पूर्णपणे डॅमेज झाली आहे. सुदैवाने कार मध्ये बसलेली नोरा फाटेही या अपघातातून वाचली आहे. जाणून घेऊया कसा झाला हा अपघा.

काय हे संपूर्ण प्रकरण

प्रसिद्ध डान्सर तथा अभिनेत्री नोरा फतेही हि मुंबई येथील फ्रेंच म्युझिक प्रोड्यूसर आणि डीजे डेविड गुएटा यांच्या कार्यक्रमासाठी जात होती. त्यासाठी घरातून निघाल्यावर नोराच्या कारचा भीषण अपघाझाला. दारूच्या नशेत असलेल्या एका चालकाने नोराच्या कारला धडक दिली. यामुळे नोराच्या कारचे प्रचंड नुकसान झाले असून नोराला सुदैवाने जास्त दुखापत झाली नाही. परंतु ती किरकोळ जखमी झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटल मध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. आता या नशेत गाडी चालवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तरीही कार्यक्रमाला उपस्थित

मिळालेल्या माहितीनुसार, सनबर्ग फेस्टिवल मध्ये डेव्हिड गुएटा सोबत नियोजित कार्यक्रमा उपस्थित राहण्यासाठी नोरा फतेही जात होती. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यानंतर तिच्या टीम ने तिला हॉस्पिटल मध्ये नेऊन तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले. आणि नोराला आराम करण्याचा सल्ला दिला. तर पोलिसांनी आरोपी चालकाला आता ताब्यात घेतले आहे. नोरा फतेही ने या घटनेनंतर देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ती आणि तिची टीम हॉस्पिटल नंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिली.

हे ही वाचा : गोला बनला मोठा दादा; भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

रजनीकांतच्या चित्रपटात करणार आयटम सॉंग

नोरा फतेही ही बॉलिवूड मधील अभिनेत्री आहे. ती खास तर तिच्या नृत्यामुळे ओळखली जाते. तिने यापूर्वी काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे रोअर . या चित्रपटाच्या माध्यमातू तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. लवकरच नोरा फतेही रजनीकांतच्या आगामी जेलर 2 चित्रपटात दिसणार आहे. तिचा या चित्रपटात आयटम नंबर मध्ये दिसेल.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts