Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुण्यात उमेदवाराने प्रतिस्पर्धीचा फॉर्म चक्क खाल्ला; उमेदवारावर गुन्हा दाखल
Pune

पुण्यात उमेदवाराने प्रतिस्पर्धीचा फॉर्म चक्क खाल्ला; उमेदवारावर गुन्हा दाखल

Police action after candidate eats rival nomination form in Pune

Pune election nomination form controversy : पुण्यात महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काल मोठ्या प्रमाणावर सर्वच पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरला असून आज अर्जाची छाननी सुरू असताना पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादातून चक्क एका उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याची घटना घडली आहे. पुण्यातील या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय हे संपूर्ण प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 02 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथे अर्ज छाननी सुरू असताना प्रभाग क्रमांक ३६ (अ) प्रभागात शिवसेना पक्षाकडून चुकून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादादरम्यान उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार घडला.

हे ही वाचा : सोलापूर महानगरपालिका निवडणूक: एबी फॉर्मवरून वाद पेटला

पोलीस तात्काळ घटनास्थळी

या प्रकरणी निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान शासकीय कामकाज करत असलेल्या लोकसेवकाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला आणि हा सगळा थांबवला.

गुन्हा दाखल

या प्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts