Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजप- अजित पवार गटात संघर्ष पेटला! अजित पवारांचा हल्ला भाजपचा प्रतिहल्ला
Pune

भाजप- अजित पवार गटात संघर्ष पेटला! अजित पवारांचा हल्ला भाजपचा प्रतिहल्ला

BJP Ajit Pawar clash

BJP Ajit Pawar clash : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपला राक्षसी भूक आहे. त्यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाल्याचा आरोप केला. शहरात लुटारूंची टोळी दिवसाढवळ्या वावरतेय, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या आरोपामुळे दोन्ही पक्षातील संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या हल्ल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रतिहल्ला केलाय.

माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला का, असा सवाल करत ज्यांनी माझ्यावर आरोप केले, मी त्यांच्यासोबतच सत्तेत आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल भाजपला लगावला होता. भाजपने पुण्यात कोट्यवधींच्या ठेवी मोडल्या. हा एक भ्रष्टाचार असल्याचा टोला त्यांनी स्थानिक भाजप आमदारांना आणि नेत्यांना लगावला. त्यावरून आता भाजप आणि दादांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एनडीए सरकारमध्ये काम करत आहात, याची आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला आहे.

हेही वाचा –  ‘लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू;’ अर्ज माघारीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी भाजपच्या काळातील विकास योजनांची उजळणी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण सेट करत आहोत. कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेल्या. आता ही निवडणूक होत आहे. मागील वर्षानुवर्ष पुण्यात ज्या गतिमान पद्धतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहेत. पायाभूत सुविधांना गती दिली जात आहे. कोट्यवधी रुपये दिले जात आहे. महापालिकेच्या स्थापनाच्या वेळेपासून स्वप्न साकार करायचं असेल तर त्या दिशेने पावलं उचलली पाहिजे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले.

पुण्यातली वाहतूक कोंडू सुटू शकते भाजपचे आआश्वासन

पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव महापालिकेत झाला. त्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणीत सरकार आल्यानंतर पुणे शहरात आतापर्यंत जवळपास ३३ किमी मेट्रोचं जाळं निर्माण झालं आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण पुणे शहरात मेट्रोच जाळ पसरवणार आहे. अनेक प्रकल्प फार गरजेचे आहेत. सार्वजनिक काम झालं पाहिजे. इलेक्टीक बस घेण्याचा निर्णय भाजपने केले आहेत. पुण्यातली वाहतूक कोंडू सुटू शकते. पुण्यातील सगळे विषय सोडवणार असल्याचे चव्हाण यांनी आश्वासन दिले.

‘खुद के गिरेबान में झाँक के देखिए’ – रविंद्र चव्हाण

ज्यांनी ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारामध्ये बसलोय ना, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर रविंद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांनी त्यांना याविषयी विचारले असता, खुद के गिरेबान में झाँक के देखिए, आम्ही जर बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण होईल असं चव्हाण म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तुम्ही काम करत आहे. त्याला तुम्ही नाकारात आहात का? असा सवाल रविंद्र चव्हाण यांनी केला.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts