Devendra Fadnavis old video viral : धुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या भाषणाची क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
मागील एका निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाष्य करताना स्वपक्षीय नगरसेवकांनाच इशारा देत, “टक्केवारी घेतली तर थेट घरी पाठवू,” असा सज्जड दम भरला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये
धुळे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते जर कोणी महानगरपालिकेत फक्त टक्केवारी खाण्यासाठी किंवा स्वतःचे खिसे भरण्यासाठी निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहत असेल, तर त्यांनी आत्ताच थांबलेले बरे. आम्हाला अशी सत्ता नको आहे. सत्ता राहिली नाही तरी चालेल, पण जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना मी पक्षात ठेवणार नाही. त्यांना थेट घरी पाठवीन. धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आज मुख्यमंत्री धुळ्यात असतानाच हा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने, तो नेमका कुणाच्या पुढाकारातून समोर आणला गेला, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले.
हे ही वाचा : ‘विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील…’ रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनी दिले प्रत्युत्तर
“टक्केवारी घेणाऱ्यांना घरी पाठवणार”
धुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर आणि विकासकामांच्या दर्जावरून नेहमीच आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशा परिस्थितीत “टक्केवारी घेणाऱ्यांना घरी पाठवणार” हे मुख्यमंत्र्यांचे जुने विधान पुन्हा समोर आल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री आपल्या आजच्या दौऱ्यात या विषयावर काही भाष्य करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












