• Home
  • राजकारण
  • भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात नवनीत राणांनी फोडले नारळ
Top News

भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात नवनीत राणांनी फोडले नारळ

Dynastic politics as multiple members of one family contest elections

Dynastic politics in elections : अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपच्या स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उभ्या असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नारळ फोडत थेट प्रचाराची धुरा स्वतः हाती घेतली.

प्रचाराचा नारळ फोडला

साईनगर येथील साई मंदिरात प्रभाग क्रमांक 17 मधील युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ नवनीत राणा यांनी फोडला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत आवाहन केले की “युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या”. त्यांच्या या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उघड भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

हे ही वाचा : घराणेशाहीचे राजकारण! एका कुटुंबातील अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात

तुषार भारती मैदानात

प्रभाग 17 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार तुषार भारतीय मैदानात आहेत. तुषार भारतीय हे आमदार रवी राणा यांचे कट्टर विरोधक असून यापूर्वी त्यांनी बंडखोरी करत त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. अशा पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना उघड पाठिंबा देणे ही मोठी राजकीय घटना मानली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना ऊत आला आहे. मात्र नवनीत राणा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts