Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • ‘विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील…’ रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनी दिले प्रत्युत्तर
Top News

‘विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील…’ रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनी दिले प्रत्युत्तर

Riteish Deshmukh reacts to Ravindra Chavan statement on Vilasrao Deshmukh

Riteish Deshmukh response to Ravindra Chavan : लातूर येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी कार्यकर्ता मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल वक्तव्य केले. आता या वक्तव्यावर स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अभिनेता रितेश देशमुख यांनी संयम ठेवत परंतु खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा श्रीवर्धनच्या बागमांडला समुद्रकिनाऱ्यावर पहिल्यांदाच आढळले नर ग्रीन सी टर्टल

काय होते वक्तव्य

लातूरमधून महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य आमदार रविंद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात केले. या वक्तव्यावर आता रितेश देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य दुर्दैव आहे.. लातूरची ही संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होत आहे..’ रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कालच्या वक्तव्यानंतर आणि देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आणि चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. ही लातूरची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिले.

काय आहे पोस्ट

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता मेळाव्यात कार्यकर्त्यांचा जोश बघून लातूर शहरांमधून विलासरावांचे विचार पुसले जातील असं विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वाद उफाळला होता. ‘लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेली असतात. कोरलेलं पुसता येत नाही’ अशा शब्दात रितेश देशमुख यांनी प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्ट मध्ये त्याने म्हंटल की, “दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेले असतात .,लिहिलेले पुसता येत पण कोरलेलं नाही” ही पोस्ट सध्या सोहळा मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts