Sambhajinagar Teacher Molestation Case : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजीनगर येथील एका शाळेतील शिक्षकानेच गुटखा खाऊन मुलींना अश्लील स्पर्श करून विनयभंग केला आहे. २०२४ ते २०२६ असे २ वर्षे शाळेतील पाच अल्पवयीन मुलींचा छळ केला असल्याचे म्हटले आहे. मागील दोन वर्षापासून या छळ सुरू होता मात्र मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलींनी हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
हेही वाचा – मुंबईतील कोळी समाज एकवटला, फक्त कोळी उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
दरम्यान, पालकांना मुली सातत्याने भयभीत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर प्रकार समोर आला. त्यानंतर नराधम आरोपी शिक्षक खाजी मूजिबोद्दीन नसिरोद्दीन (४०, रा. नॅशनल कॉलनी, हसूल) यास अटक केल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. या प्रकरणी शाळेच्या मख्याध्यापिकेने फिर्याद दिली आहे.
आरोपी शिक्षक २०२४ पासून शाळेत आहे. त्याने गुटखा खाऊन सहावी आणि सातवीच्या १४-१५ वर्षीय मुलींशी गैरवर्तन केले. तो वर्गात मोजक्या पाच मुलींना जबरदस्तीने उभा करायचा. त्यांच्या अंगाला अश्लील स्पर्श करायचा. धार्मिक प्रार्थना का करत नाही म्हणून मारहाण करायचा, असा आरोप फिर्यादीत केला आहे.
या प्रकाराबाबत मुलींनी पालकांना कळविले. पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षकाला चौकशीसाठी नोटीस बजावली असता तो गैरहजर राहिला. त्यामुळे मुख्याध्यापिकेने तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक राधा लाटे करीत आहेत.












