Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गुलाबांना ‘व्हॅलेंटाइन डे निमित्त’ आंतरराष्ट्रीय मागणी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा
Pune

गुलाबांना ‘व्हॅलेंटाइन डे निमित्त’ आंतरराष्ट्रीय मागणी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Valentine’s Day Rose International Demand

Exports to and from home and abroad : व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात उत्पादित होणाऱ्या लाल गुलाबांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी निर्माण झाली आहे. मावळ तालुका हा महाराष्ट्रातील प्रमुख फुल उत्पादन क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आधुनिक पॉलीहाऊस पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांनी गुलाब उत्पादनात लक्षणीय वाढ केली आहे.

हेही वाचा – मुंबईत बनला भारतातील पहिला ‘म्यूजिकल रोड’; गाडी चालवताना वाजतील ‘जय हो’ चे सूर

यंदा ७० ते ८०लाख गुलाबांची परदेशात निर्यात होण्याची शक्यता असून, ९० लाख ते १ कोटी गुलाब देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी पाठवले जात आहेत. हॉलंड, ब्रिटन, दुबई, सिंगापूर, जपान यांसारख्या देशांतून गुलाबांसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असून, निर्यात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.

हवामान अनुकूल राहिल्यामुळे गुलाब उत्पादनात वाढ

शेतकऱ्यांच्या मते, यंदा हवामान अनुकूल राहिल्यामुळे गुलाब उत्पादनात वाढ झाली असून, फुलांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने बाजारात चांगली मागणी आहे. गुलाब शेतीमुळे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळत असून, ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त वाढलेल्या मागणीमुळे मावळातील गुलाब आता केवळ प्रेमाचे प्रतीक न राहता, शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचे माध्यम ठरत आहेत.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts