MP Kalyan Kale | सध्या अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. एकिकडे अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन देश इराणवर हल्ले करताना दिसत आहे, तर दुसरीकडे इराणही या दोन्ही देशांना प्रत्युत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे सध्या युद्धाचा वणवा फडकताना दिसत आहे. इराणनेही इस्त्रायल, दुबईसह (Dubai) अनेक देशांवर हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे दुबईतील विमान उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. तसेच या युद्धाचा जोरदार फटका भारतीयांना बसला आहे. कारण विमान उड्डाणे स्थगित करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक पर्यटक दुबईत अडकून पडले आहेत. या पर्यटकांमध्ये एका बड्या नेत्याचा देखील समावेश आहे.
हेही वाचा – “हे अतिशय गंभीर, स्वत: पायलट सीटवर बसून…”, ‘तो’ व्हिडिओ शेअर करत युगेंद्र पवारांनी केली मोठी मागणी
महाराष्ट्रातील अनेक पर्यटक दुबईत अडकले आहेत. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे (MP Kalyan Kale) हे देखील दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच कल्याण काळे दिल्लीवरून दुबईला गेले होते. तर आता विमान सेवा बंद असल्यामुळे कल्याण काळे दुबईत अडकून पडले आहेत. तसेच ते एका हॉटेलमध्ये असून सुखरूप असल्याची माहिती त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबईत अडकून पडले आहेत. नागपूरो उमराह यात्रेसाठी मक्का-मदीन येथे गेलेले हजारो यात्रेकरू अडकून पडले आहेत. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून जवळपास 50,000 लोक गेले असल्याची माहिती समोर आली आहे.











