Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकेचा बंदरावर हल्ला आणि धक्का भारताला..!
Top News

अमेरिकेचा बंदरावर हल्ला आणि धक्का भारताला..!

chahabah port

america-iran-israiel war : अमेरिका-इराण-इस्राईल युद्धाचा (america-iran-isrraiel war) फटका आता भारतालाही बसू लागला आहे. या युद्धाचे चटके सोसावे भारतालाही सोसावे लागणार असल्याने इंधनाच्या (Fuel) किमती वाढणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, अमेरिकेने आणि इस्त्रायलने भारताच्या हितसंबंधांवरच मोठा हल्ला चढवला आहे.अगोदर अमेरिकेने चाबहार बंदरावर (Chabahar Port) मोठा हल्ला केला, तिथेच भारताला मोठा धक्का बसला. हे बंदर भारताकडून विकसित करण्यात आले होते. त्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यामुळे भारताला मोठा धक्का बसलाय. अमेरिकेने चाबहार बंदरावर हल्ला केल्याने भारताच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे.

हे ही वाचा: अशोक खरातचा पाय आणखी खोलात; चौकशी सुरु असतानाच…!

अनेक देशांवर परिणाम

अमेरिका-इराण-इस्राईल युद्धाचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागत आहेत. त्यात भारताचीही समावेश आहे. भारताला क्रूड ऑईलचा (Crude Oil) पुरवठा आखाती देशातून होतो. परंतु या युद्धामुळे क्रूड ऑईलचा पुरवठा काही अंशी थांबला आहे. त्याचा परिणाम भारतातील इंधन दरावर झालाय. इंधनाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारताचे मध्य आशियातील प्रवेशद्वार

आता अमेरिकेने आणि इस्त्रायलने भारताच्या हितसंबंधांवरच मोठा हल्ला चढवला आहे.अगोदर अमेरिकेने चाबहार बंदरावर मोठा हल्ला केला, तिथेच भारताला मोठा धक्का बसला. हे बंदर भारताकडून विकसित करण्यात आले होते. हे भारताचे मध्य आशियातील प्रवेशद्वार मानले जाते. आता इराणच्या आणखी एका बंदर शहरावर बंदर-ए-अंजलीवर (Bandar-e-Anjali) हवाई हल्ला करण्यात आला आहे, ज्यानंतर भारताला मोठा धक्का बसला असून भारताचे थेट नुकसान झाले.

भारताच्या योजनांना मोठा धक्का

दरम्यान, भारत आणि रशियाचे उद्दिष्ट आहे की, या कॉरिडॉरमार्फत (Corridor) 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवावा. मात्र, आता अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांनी भारताच्या योजनांना मोठा धक्का दिला आहे.भारताचे थेट नुकसान होताना दिसत आहे. दोन्ही शहरांवर हल्ले केले जात आहे. अगोदरच या युद्धामुळे होर्मुज खाडी बंद असल्याने भारताचे मोठे नुकसान होत आहे. भारताच्या 940000 कोटी रुपयांच्या या स्वप्नावर हल्ला केला आहे.

हल्ल्याशी संबंधित मुख्य बाबी:

हल्ल्याचे स्वरूप: अमेरिकन लढाऊ विमानांनी चाबहार फ्री ट्रेड झोनजवळच्या डोंगराळ भागातील लष्करी तळांवर बॉम्बफेक केली.

भारताचा मोठा फटका: हे बंदर भारत विकसित करत असून, पाकिस्तानला बगल देऊन मध्य आशियात जाण्याचा हा भारताचा मुख्य मार्ग आहे.

तणाव वाढला: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील १७ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा हा भाग आहे.

परिणाम: या हल्ल्यामुळे चाबहार बंदराच्या पायाभूत सुविधांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराणमधील या वाढत्या अस्थिरतेमुळे भारताच्या पश्चिम आशियातील धोरणात्मक हितसंबंधांना धोका निर्माण झाला आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts