Iran Attack On US A-10 Fighter Jet | गेल्या महिनाभरापासून अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये मोठे युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण असून तिन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. अशातच आता इराणने अमेरिकेला टार्गेट केले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे A-10 लढाऊ (US A-10 Fighter Jet) विमान लक्ष्य करत पाडले आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा – कोठडीतील दिवस पडले भारी; भोंदू खरातचं वजन घटलं, प्रकृती खालावली
इराणने अमेरिकेच्या ए-10 लढाऊ विमानाबाबत केला मोठा दावा
समोर आलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने दावा केला आहे की, त्यांच्या लष्कराने अमेरिकेचे ए-10 हे जमिनीवर हल्ला करणारे विमान लक्ष्य करून यशस्वीरित्या पाडले आहे. या हल्ल्यानंतर आखाती प्रदेशातील तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेतली आणि इराणमधील लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत.
इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचे एक ए-10 विमान पाडले आहे. तसेच या हल्ल्याबाबत इराणच्या लष्कराच्या जनसंपर्क पथकाने सांगितले की, “होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडील आणि आसपासच्या पाण्यात अमेरिकेच्या ए-10 विमानाला लक्ष्य करण्यात आले होते.” तर इराणने केलेल्या या हल्ल्यावर अमेरिकेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान
अमेरिकेचे ए-१० हे जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करणारे महत्त्वाचे विमान आहे. हे विमाव जे जवळून हवाई साहाय्य करण्याच्या मोहिमांसाठी तयार केले गेले आहे. तसेच विशेषतः चिलखती वाहने व भूदलांविरुद्ध कारवाई करण्यासाठी हे विमान बनवले आहे. तर आता या विमानाला इराणने टार्गेट करत पाडल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इराणने अमेरिकेचे एफ-16 हे लढाऊ विमान लक्ष्य करत पाडले होते. याबाबतची माहिती इराणच्या निमलष्करी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने दिली होती. IRGC ने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने अमेरिकेचे एफ-16 लढाऊ विमान आणि एक एमक्यू-9 ड्रोन पाडले आहे. आयआरजीसीने दावा केला आहे की, त्यांनी दक्षिण इराणमधील शिराझ शहरावरून उडणारा एक अमेरिकन MQ-9 ड्रोन यशस्वीरित्या पाडला आहे. तसेच अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानावर हल्ला देखील केला असल्याचा दावाही आयआरजीसीने केला होता. तर आता इराणने पुन्हा एकदा अमेरिकेचे ए-10 हे लढाऊ विमान पाडले असून अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. या तिन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण अद्यापही हे तिन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करताना दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.










