Breaking News :
  • Home
  • देश
  • मोठी बातमी! भारताच्या ‘ग्रीन सान्वी’ एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी केली पार; कधी पोहोचणार भारतात?
Top News

मोठी बातमी! भारताच्या ‘ग्रीन सान्वी’ एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी केली पार; कधी पोहोचणार भारतात?

green sanvi

Hormuz Strait | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिका, इस्रायलने मिळून इराणवर केलेल्या हल्ल्याला महिनाभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरी हे युद्ध थांबण्याचे नाव काही घेत नाहीये. एकिकडे अमेरिका, इस्त्रायल इराणवर जोरदार हल्ले करत आहे. तर दुसरीकडे इराणही या दोन्ही देशांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे. इराणने वाढत्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीचा (Hormuz Strait) मार्ग बंद केला आहे ज्यात अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. तर या युद्धादरम्यान आता भारताला मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा – कोठडीतील दिवस पडले भारी; भोंदू खरातचं वजन घटलं, प्रकृती खालावली

‘ग्रीन सान्वी’ जहाजाने पार केली होर्मुझची सामुद्रधुनी

मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान आणखी एका भारतीय ध्वज असलेल्या एलपीजी टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे. ‘ग्रीन सान्वी’ (Green Sanvi) असं या जहाजाचं नाव असून या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे. हे जहाज 44,000 मेट्रिक टनांहून अधिक एलपीजी घेऊन भारतात जात आहे.

‘ग्रीन सान्वी’ जहाज कधी पोहोचणार भारतात?

‘ग्रीन सान्वी’या जहाजाने शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली असून ते 6 एप्रिलपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या युद्धादरम्यान मार्च महिन्यात होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारे हे आतापर्यंतचे सातवे भारतीय जहाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ग्रीन सान्वी’ या भारताच्या जहाजाने इराणी सागरी मार्गाचा वापर करून होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्व बाजूला प्रवेश केला आहे. तर आता जे जहाज मुंबईच्या दिशेने जात आहे. तसेच लवकरच ‘ग्रीन आशा’ आणि ‘जग विक्रम’ हे आणखी दोन भारतीय ध्वज असलेले एलपीजी टँकर होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून भारतात परत येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतासाठी ही दिलासादायक बातमी असणार आहे.

दरम्यान, मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद केला आहे. हा मार्ग बंद केल्यामुळे अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. अशातच भारताच्या आत्तापर्यंत सात जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts