Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोंदू खरातसोबतच्या अश्लील व्हिडीओंची बाजारात विक्री, एक व्हिडीओची किंमत किती? 
Top News

भोंदू खरातसोबतच्या अश्लील व्हिडीओंची बाजारात विक्री, एक व्हिडीओची किंमत किती? 

Bhondu Kharat obscene videos sale

Bhondu Kharat obscene videos sale : भोंदू खरात प्रकरणात (The Fraudulent Kharat Affair) फसलेल्या महिला मानसिक तणावात (Women Under Mental Stress) असल्याचं समोर आलेलं असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येतेय… खरातसोबत महिलांचे व्हायरल झालेले अश्लील व्हिडीओंची (Obscene video) आता बाजारत विक्री सुरू (Sales have started in the market) झाली आहे. खरातनं महिलांवर केलेल्या अत्याचाराचा ‘बाजार’ भरवला जातोय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. या महिलांच्या अश्लील व्हिडिओंची ऑनलाई विक्री सुरू आहे आणि ती सुद्धा केवळ 20 ते 50 रुपयांत…

हेही वाचा – भोंदू खरात प्रकरणात मेगा प्लन, SIT प्रमुख तेजस्वी सातपुते सर्वच सांगितलं

फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ज्यांना हे व्हिडीओ पुर्ण बघायचे आहेत अशांना काही रूपये भरून ते बघण्याची सोय करून दिली जातेय. लोकं पैसे देऊन हे व्हिडिओ पाहतायत आणि पुढे शेअरही केलेत. भोंदू खरातविरोधात आजवर 11 महिलांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे… पोलीसांकडे खरातचे 100 हून अधिक अश्लील व्हिडीओ आहेत, ज्यामध्ये अनेक उच्चशिक्षित आणि नामांकित महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने आता या प्रकरणांमध्ये IT अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे…महाराष्ट्र सायबर प्रमुख यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं ते म्हणाले. अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाऊंट विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts