Rohit Pawar | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजप (BJP) मित्रपक्षांची शिकार करणार, असा खळबजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – धक्कादायक! लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेसोबत मोठा गैरप्रकार, सत्य ऐकून बसेल धक्का
रोहित पवारांनी नेमका काय केला दावा?
रोहित पवारांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजपसोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. रोहित पवारांनी पोस्ट शेअर दावा केला आहे की, भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही तर ठरवून आणलं गेलं असून ही फक्त सुरुवात आहे, असं खळबळजनक वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.
आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील, असा सल्लाही रोहित पवारांनी दिला आहे. तसंच या पोस्टच्या शेवटी काम कमी कुरापती जास्त असा खोचक हॅशटॅगही रोहित पवारांनी दिला आहे.
भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे.
महाराष्ट्राला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 12, 2026
रोहित पवारांनी शेअर केलेल्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवारांनी केलेला हा दावा खरंच ठरणार का? असा सवाल सध्या निर्माण केला जात आहे. तसेच त्यांच्या या दाव्यावर महायुती नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.












