Love Guru Ayaan Advice : अमरावतीचं अयान प्रकरण म्हणजे रोज नव्या एका खुलाशाचा धक्का असंच बनत चाललंय, कारण कोठडीत असलेल्या अयानचा फास आता पोलिसांनी अधिक आवळला आहे, पोलिसी खाक्या दाखवत अयानला पोलिसांनी पोपटासारखा बोलता केलाय (Confession to the Police), त्याच्या जबाबातून पोलिसांनाही हादरवून टाकणारी माहिती समोर येतेय, या प्रकरणात त्यांने अनेक मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढले, त्यात याला नेमकी कुणीकुणी याला मदत केली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत, हाच तपास करताना पोलिसांच्या समोर एक धक्कादायक माहिती आली ती म्हणजे लव्ह गुरूची (Love Guru). होय मंडळी तुम्ही बरोबर ऐकलंच. आपण आजपर्यंत रेडिओवरचे लव्ह गुरु ऐकले होते, पण अयानला मुली पटवण्यासाठी प्रत्यक्षात एक लव्ह गुरू सल्ले (Strange Advice) देत होता, त्याच्या अजब सल्ल्यामुळेच अयान (Ayan Khan) इथपर्यंत पोहोचला आहे. एवढ्या मुली पटवण्यासाठी लव्ह गुरू अयानला नेमके काय सल्ले देत होता? हेच आपण या लेखातून पाहाणार आहोत.
हेही वाचा – नाशिक SITचा मुंब्र्यात छापा; पती ताब्यात, तरीही निदा खान जाळ्यातून निसटली
अमरावतीच्या परतवाडा परिसरात समोर आलेले लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण हे केवळ गुन्हेगारी कृत्य नसून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला कशा प्रकारे जाळ्यात ओढले जात आहे, याचं एक भीषण वास्तव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयान अहमद याने ज्या पद्धतीने निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले, त्यामागे एका ‘लव्ह गुरू’चे नियोजनबद्ध आणि अत्यंत विकृत मार्गदर्शन असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ही बातमी केवळ एका गुन्ह्याची नसून ती सोशल मीडियाच्या युगातील एका मोठ्या धोक्याची घंटा आहे.
मोबाईलमधील चॅट्स आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण
तपासादरम्यान अयानच्या मोबाईलमधील चॅट्स आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले असता, त्याला मार्गदर्शन करणाऱ्या एका ‘लव्ह गुरू’चे चॅट समोर आले. हा लव्ह गुरू अयानला तरुणींशी संवाद साधण्यापासून ते त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी तयार करेपर्यंतचे सर्व धडे देत होता. या गुरूने अयानला दिलेला सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे संवादाची सुरुवात कधीही साध्या ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ने करू नको. त्याच्या मते, अशा साध्या मेसेजेसना मुली फारसा प्रतिसाद देत नाहीत. त्याऐवजी, त्याने अयानला मुलींना संभ्रमात टाकून उत्तर देण्यास भाग पाडणारी एक विशेष क्लृप्ती शिकवली होती.
लव्ह गुरूकडून मुलींना प्रभावाखाली आणण्याचे ‘प्रशिक्षण’
अयान कोणत्याही मुलीला मेसेज करताना थेट प्रश्न विचारायचा की, “आप वही हो ना जो वहां मिले थे?”हा असा प्रश्न होता की, ज्यावर कोणतीही मुलगी विचारात पडायची. आपण या मुलाला नक्की कुठे भेटलो असू, असा विचार करून कुतूहलापोटी त्या मुली ‘कधी?’ किंवा ‘कुठे?’ असा प्रतिप्रश्न करायच्या. एकदा का मुलीने प्रतिसाद दिला की, अयानचे जाळे विणणे सुरू व्हायचे. लव्ह गुरूने त्याला मुलींना भावनिक साद कशी घालायची, त्यांचा विश्वास कसा जिंकायचा आणि हळूहळू त्यांना आपल्या प्रभावाखाली कसे घ्यायचे, याचे पूर्ण ‘प्रशिक्षण’ दिले होते.
अयान मुलींना प्रेमाच्या खोट्या आमिषाने जाळ्यात
या ‘लव्ह ट्रॅप’मध्ये अडकल्यानंतर अयान मुलींना प्रेमाच्या खोट्या आमिषाने जाळ्यात ओढायचा. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले जात असत. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात सुमारे १८० हून अधिक मुलींचे आयुष्य पणाला लागल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या आरोपींनी ३५० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप असून, या व्हिडिओंच्या माध्यमातून पीडित मुलींना सतत ब्लॅकमेल केले जायचे. जर कोणत्याही मुलीने विरोध केला किंवा कुणाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर तिचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली जायची.
तपासासाठी ४७ सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना
या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता, राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी ४७ सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. पोलीस सध्या त्या ‘लव्ह गुरू’चा शोध घेत आहेत, ज्याने अयानला अशा विकृत मार्गाला लावले. तसेच, या रॅकेटमध्ये अयानला मदत करणारे त्याचे इतर साथीदार आणि ज्यांनी या गुन्ह्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणातील आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवरही हातोडा चालवून गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे संपूर्ण प्रकरण डिजिटल युगातील पालकांसाठी आणि तरुणांसाठी एक मोठा धडा आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींनी विचारलेल्या साध्या प्रश्नामागेही किती मोठे षडयंत्र असू शकते, हे यातून स्पष्ट झाले आहे. सायबर पोलीस आता या प्रकरणातील सर्व तांत्रिक दुवे जोडण्याचे काम करत असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.












