Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ब्लॅकमेल करत दारू पाजून तिच्या हातातील धागा काढला, कपडे काढले अन्…, नाशिकमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार
Top News

ब्लॅकमेल करत दारू पाजून तिच्या हातातील धागा काढला, कपडे काढले अन्…, नाशिकमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार

Nashik Crime | मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) गुन्ह्याचे सत्र सुरूच आहे. नाशिकमध्ये एकामागून एक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. आधी भोंदू अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. नंतर नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत (Nashik TCS Company) अनेक महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ज्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. तर दोन्ही घटना ताज्या असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा – “विरोधी पक्षांची भूमिका कपटी…”, महिला आरक्षणावरून वाद पेटला; योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

नाशिकमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार

नाशिकमध्ये एका तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित तरूणीला ब्लॅकमेल करून तिला विविध ठिकाणी फिरवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोबतच तिचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेमकं घडलं काय?

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तंजीन इनामदार हा पीडित तरूणीच्या संपर्कात होता. काही दिवसांनंतर पीडित तरूणी आरोपीला भेटायला गेली असता आरोपीने तिला जवळ घेऊन तिला मिठी मारली आणि तिच्या गळ्याला चावा घेतला. नंतर त्याला आरोपीने लव्ह बाईट आहे असं सांगितलं. तसेच त्याने पीडितेचे लव्ह बाईट घेतलेले फोटो देखील काढले. काही दिवसानंतर आरोपीने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला जबरदस्ती लॉजवर नेले. तिथे तिला सिगारेट आणि दारू पाजून तिचे कपडे काढले आणि तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले.

अत्याचारानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. आरोपीने पीडितेच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली, तिच्या हातातील धागा काढला आणि विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजरा हिंद’ करण्यास तिला सांगितले, अशी माहिती पीडितेने आपल्या तक्रारीत दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

आरोपीला अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपीच्या वकिलाने कोर्टात दावा केला की, हे एक प्रेम प्रकरणा आहे. तरूणीला फक्त एकदाच लॉजवर नेण्यात आलं होतं. तसेच गजरा हिंद म्हणजे काय आहे याबाबत आम्हाला माहिती नाही, असा दावा वकिलांनी केला आहे. तर आता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत असून गजरा हिंद म्हणजे काय आणि आरोपीसोबत आणखी कोणी आहे का? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये पुन्हा एकदा तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts