Gold-Silver Rate | गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज (21 एप्रिल) सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात आणखी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव मागील सत्राच्या तुलनेत 0.03 टक्क्यांनी किंचित घसरून प्रति 10 ग्रॅम 1,52,900 रुपयांवर आला आहे. तर गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात (Gold Rate) किंचित फरक झाला आहे, परंतु बाजाराचा एकूण कल स्थिर राहिला आहे.
हेही वाचा – भूकंपाने दणका; मणिपूर हादरला, ईशान्य राज्यांमधील लोकांनी सोडली घरे
सोने-चांदीच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या आजचा दर
राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने ₹15,544 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोने ₹14,250 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोने ₹11,662 प्रति ग्रॅम दराने विकले जात आहे. तर मुंबई, कोलकाता आणि बंगळूरुमध्ये सोन्याचे भाव जवळपास सारखेच राहिले आहेत. या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹15,529, 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹14,235 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹11,647 आहे. तसेच चांदीचा भाव देखील मागील सत्राच्या तुलनेत 2.04 टक्क्यांनी घसरून प्रति किलो ₹2,51,889 वर पोहोचला आहे.
दक्षिण भारतातील प्रमुख शहर असलेल्या चेन्नईमध्ये सोन्याचे भाव इतर शहरांपेक्षा थोडे जास्त आहेत. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹15,600, 22 कॅरेटचा ₹14,300 आणि 18 कॅरेटचा ₹11,855 नोंदवला गेला आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या किमतींमध्ये किंचित फरक असूनही, एकंदरीत सोन्याचा बाजार स्थिर राहिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना एक संतुलित संकेत मिळत आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी कालावधी संपण्यापूर्वी चर्चेच्या दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा असल्याने गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. मध्य-पूर्वेतील सध्याच्या तणावाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे महागाई वाढण्याचा धोका वाढला आहे आणि मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढवण्याची शक्यताही बळकट झाली आहे. या घटकांचा दबाव सोन्याच्या किमतींवर स्पष्टपणे दिसून येत आहे. इराण संघर्ष सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 8 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.












