Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आता दहावी-बारावी विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार; ‘या’ तारखे पर्यंत करा अर्ज!
ताज्या बातम्या

आता दहावी-बारावी विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणार; ‘या’ तारखे पर्यंत करा अर्ज!

Maharashtra SSC and HSC Exam Fee Refund Announcement: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे परत केली जाणार आहे.

या निर्णयाचा फायदा अनेक जिल्ह्यातील तालुक्यांमधील पात्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परीक्षा फी परत मिळवण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून, ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

हेही वाचा: नाव बदललं ‘दिव्यांग’, पण वास्तव तसंच; अपंगांच्या व्यथा अजूनही कागदावरच

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये परीक्षेस बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांना ही फी परत दिली जाईल. ही रक्कम NEFT किंवा RTGS च्या माध्यमातून थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.

ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू

यासाठी संबंधित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या लॉगिनद्वारे पात्र विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मंडळाच्या पोर्टलवर ही प्रक्रिया 20 एप्रिल 2026 ते 2 मे 2026 या कालावधीत उपलब्ध असेल.

कोणती माहिती भरावी लागेल?

विद्यार्थ्यांची खालील माहिती भरावी लागणार आहे:

बैठक क्रमांक
विद्यार्थ्याचे नाव
बँक खाते क्रमांक
IFSC कोड
आधार क्रमांक

ही माहिती भरल्यानंतर शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्याला “पात्र” असा शेरा द्यावा लागेल.

पैसे कधी मिळणार?

पात्र विद्यार्थ्यांची माहिती तपासल्यानंतर मंडळाकडून NEFT किंवा RTGS द्वारे थेट बँक खात्यात फीची रक्कम जमा केली जाणार आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts