fireworks factory in China : चीनमध्ये फटाके (Fire in China) तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने (Massive Explosion) मोठी जीवितहानी झाली आहे. हुनान प्रांतातील लियुयांग शहरात घडलेल्या या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू (21 Dead) झाला असून ६१ जण जखमी (61 injured) झाले आहेत.
हेही वाचा – नराधम कांबळे घाणेरडी विकृती, शेळ्या अन् कोंबड्यांवरही अत्याचार
जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. ग्वांडू परिसरातील फटाके निर्मिती करणाऱ्या एका कारखान्यात अचानक स्फोट झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या भागातही त्याचा मोठा परिणाम जाणवला. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर सुमारे पाचशे बचाव कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. कारखान्याजवळ असलेल्या दारुगोळ्याच्या साठ्यामुळे धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आसपासच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. पुढील अनर्थ टाळण्यासाठी विविध प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. बचावकार्यादरम्यान संभाव्य धोके कमी करण्यासाठी पाणी फवारणी तसेच आर्द्रता वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
शोधमोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी यंत्रमानवांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, या स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. संबंधित कारखान्याच्या जबाबदार व्यक्तींवरही नियंत्रणात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.












