Nashik TCS Nida Khan Arrest: नाशिक येथील बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची संशयित मुख्य आरोपी निदा खानच्या अटकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आधी एमआयआम चे खासदार इम्तिआज जलील यांच्यावर निदा खानला फरार होण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला होता. आता त्यावर प्रत्युत्तर देत “मी पालकमंत्र्याना काडी मात्र भाव देत नाही” असे वक्तव्य इम्तिआज जलील द्वारे करण्यात आले आहे.
लपून बसलेले घर एमआयम च्या नगरसेवकाचे ?
नाशिक येथील संशयित निदा खानला काळ रात्री नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमधून पकडले. ज्या घरात निदा खान लपून बसली होती ते घर एमआयम च्या नगरसेवकाचे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम चे खासदार इम्तिआज जलील यांची देखील चौकशी होणार का? अशी चर्चा देखील रंगत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याबाबतीत आक्रमक पवित्र घेतला थेट चोकशी करण्याची मागणी केली आहे. मध्यंतरी निदा खानला इम्तियाज जलील यांनी पाठिंबा दिला असल्यामुळे हे प्रकरण चांगलेच रंगत आहे.
पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू
“मला जर पोलिसांनी बोलवलं तर मी पूर्ण सहकार्य करेल”, असे जलील म्हणाले. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण कोणालाच आरोपी म्हणू शकत नाही असे देखील म्हणाले. निदा खानची चूक नसेल तर माझा संपूर्ण पाठिंबा निदा खानला असून मी तिला मदत करेल. या सर्व विधानानंतर राजकीय वातावरण चांगलाच रंग घेणार हे मात्र निश्चित आहे. निदा खानची चौकशी नाशिक पोलिसांद्वारे सुरु असून आणखी काय मुद्दे बाहेर येतील ह्याकडे आता लक्ष आहे.










