Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • जगावर नवं संकट! ‘हंटा व्हायरस’चा भीषण उद्रेक; संसर्गाचा मोठा धोका
Top News

जगावर नवं संकट! ‘हंटा व्हायरस’चा भीषण उद्रेक; संसर्गाचा मोठा धोका

Hantavirus outbreak

Hantavirus outbreak : एका डच जहाजावर जीवघेण्या ‘हंटाव्हायरस’चा संसर्ग पसरलेला असतानाच, २४ एप्रिल रोजी डझनभर प्रवाशांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता जहाज सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘ओशनवाइड एक्सपीडिशन्स’ या कंपनीच्या ‘एमव्ही होंडियस’ या जहाजावर ११ एप्रिल रोजी एका डच व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सेंट हेलेना बेटावर उतरवला. त्या बेटावर त्याची पत्नी उतरली, पण नंतर ती दक्षिण आफ्रिकेत गेली व तिथे तिचा मृत्यू झाला. कंपनीने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला.

२४ एप्रिलचे पलायन :

‘ओशनवाइड एक्सपीडिशन्स’च्या मते २९, तर नेदरलँड सरकारनुसार सुमारे ४० प्रवाशांनी २४ एप्रिलला जहाज सोडले. हे प्रवासी कोणतीही ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ प्रक्रिया पूर्ण न करताच आपल्या देशांकडे रवाना झाले.

चार ब्रिटिशांवर उपचारः

एका ब्रिटिश व्यक्तीला प्रकृती बिघडल्याने असेंशन बेटावर उतरवून दक्षिम आफ्रिकेत नेण्यात आले. तसेच, बुधवारी जहाज केप वर्डेजवळ होते, तेव्हा एका ब्रिटिश डॉक्टरसह तीनजणांना उपचारासाठी युरोपला हलवण्यात आले.

मृत्यू आणि संसर्गः

या विषाणूमुळे ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी आजारी आहेत. स्वित्झर्लंडला गेलेला एक प्रवासी हंटाव्हायरस पॉझिटिव्ह आहे. हंटा व्हायरस म्हणजे काय आणि तो मानवी शरीरात कसा पसरतो? (What is Hantavirus?)
हंटाव्हायरस हा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषाणू आहे. तो प्रामुख्याने उंदीर, घुशींमार्फत पसरतो.

पसरण्याचे मार्ग : जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संक्रमित उंदरांच्या लघवी, लाळ किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यास हा विषाणू मानवामध्ये प्रवेश करतो.

हवेतून प्रसार : उंदरांचे मलमूत्र वाळल्यानंतर त्याचे सूक्ष्म कण हवेत मिसळतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेते, तेव्हा हे कण शरीरात जाऊन फुफ्फुसांना हानी पोहोचवतात.

मानवी संक्रमण : हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असले तरी, सध्याच्या परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञ त्या शक्यतेवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts