Kerala CM Race : नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेसला केरळमध्ये (Kerala Legislative Assembly) घवघवीत यश मिळाले आहे. मात्र आता मुख्यमंत्री निवडीचं मोठं आव्हान पक्षासमोर उभं राहिलं आहे. काँग्रेसला (Congress) तीन प्रमुख नेत्यांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड (Selection of the Keral CM) करायची आहे, पण अद्याप कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. यासाठी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात महत्त्वाची बैठक (Meeting in Delhi) झाली मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या नावावर एकमत झालेले नाही.
मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती दिल्लीतील बैठकीनंतर काँग्रेस नेत्या दीपा दास मुंशी यांनी माध्यमांना दिलीय. मात्र, नेमकी तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. 23 मे ही केरळमध्ये सरकार स्थापनेची अंतिम मुदत आहे. त्याआधी नवीन सरकार स्थापन करणं गरजेचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या नेत्याला मुख्यमंत्री बनवू इच्छित असल्याने काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोषही दिसून येत आहे.
हेही वाचा – सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा ‘एक्सप्रेस वे’वर अपघात; स्वतः दिली माहिती
मुख्यमंत्री पदासाठी या ३ नावांची जोरदार चर्चा…
या यादीमध्ये के. सी. वेणुगोपाल यांचं नाव पुढं आलं आहे. त्यांच्यानंतर रमेश चेन्नीथला आणि व्हि.डी. सतीष यांनी तीन नावांची मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, पद एक आणि नावे अनेक असल्याने काँग्रेसपुढे केरळचा किल्लेदार जाहीर करण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. वरील तिघेही मुख्यमंत्री पदासाठी पक्षांतर्गत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दिल्लीत पार पडलेली ही बैठक तीन तासांहून अधिक काळ चालली. मुख्यमंत्रीपदासाठी कोण योग्य ठरेल यावर सर्वांनी आपली मते मांडली. मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम झालेले नाही.
के.सी. वेणुगोपाल या प्रभावसाली नेत्यांमुले प्रकरण अधिक गुंतागुंतिचे
रमेश चेन्नीथला यांनी हरिपाद मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. तर व्ही.डी. सतीश यांनी परवूर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. के.सी. वेणुगोपाल यांनी मात्र या निवडणुकीत उमेदवारी दाखल केली नव्हती. ते काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या लढाया मुख्यतः राज्यस्तरीय नेत्यांपुरत्याच मर्यादित राहिल्या होत्या. मात्र यावेळी के.सी. वेणुगोपाल यांच्यासारख्या हायकमांडमधील प्रभावशाली नेत्याच्या नावाने प्रकरण अधिक गुंतागुंत झाले आहे.












