• Home
  • राजकारण
  • राष्ट्रवादीत मोठी खळबळ! कार्यकरणीचा यादीवरून वाद, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण
Mumbai

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! कार्यकरणीचा यादीवरून वाद, सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

NCP Internal Conflict

NCP Internal Conflict : राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाच्या पक्षात मोठी राजकीय खळबळ निर्माण झाल्याची दिसत आहे. निवडणूक आयोगला दिलेल्या यादीत राष्ट्रवादी पक्षाच्या कॉंग्रेस्च्या राष्ट्रीय कार्यकरणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे वगळली आहेत. मात्र या यादीवररून आता सुनेत्रा पवार यांचे स्पष्टीकरण समोर आले आहे.

नेमके काय झाले?

सोशल मीडियावर सध्या एक पत्र जोरदार व्हायरल होत होते. हे पत्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची निवडणूक आयोगागकडे देण्यात आलेली यादी आहे असा दावा करण्यात आला होता. या यादीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तर पार्थ आणि जय पवारांचा राष्ट्रीय सरचटणीस म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे फक्त लोकसभा खासदार आणि राज्यसभा खासदार असे लिहिण्यार्त आलॆ असून त्याना पक्ष कार्यकारणीत कुठेही स्थान नव्हते. या यादीमुळे पक्षात अंतर्गत वाद असल्याची चर्चा जोरदार रंगात आहे. या चर्चाना वेग आला असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबतीत खुलासा केला आहे.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार यांनी मध्यरातरी आपल्या सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्राबाबत खुलासा केला आहे. या पत्राबाबतीत सुनेत्रा ताई म्हणाल्या, प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक तांत्रिक चूका असून लवकरच नवीन यादी जाहीर केली जाईल. असे जाहीर केल्यानंतर खरोखरच तांत्रिक चूक आहे का राजकीय सर्ववंसराव केली जात आहे अश्या चर्चाना उधाण आले आहे. या नवीन यादीमुळे पक्षात अंतर्गत वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा संभाळली. मध्यंतरीच्या काळात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष काबीज कआर्ट असल्याचा आरोप केला जात होता. त्यातच या पत्रामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts