Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • विद्यार्थ्यांना मोठा धक्का! NEET UG 2026 रद्द? पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्राचा मोठा निर्णय
ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांना मोठा धक्का! NEET UG 2026 रद्द? पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्राचा मोठा निर्णय

NEET UG 2026 Exam: राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून अनेक विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी नीट यूजी २०२६ परीक्षेची तयारी केली होती. मात्र, ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. NEET UG 2026 परीक्षेबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: मुंबई इंडियन्समध्ये फूट? रोहित-हार्दिक प्रकरण पुन्हा तापलं, सोशल मीडियावर खळबळ

यंदा देशभरातील तब्बल २२ लाखाहून अधिक विद्यार्थांनी नीट परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही गटांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासादरम्यान एका “गेस पेपर”मधील अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे पेपरफुटीचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.

या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप केला जात आहे. Rahul Gandhi यांनीही या विषयावर प्रतिक्रिया देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. Rohit Pawar यांनी परीक्षांमधील गैरप्रकार थांबवण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या रॅकेटवर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून पेपरफुटीमागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. नव्याने परीक्षा घेण्याबाबत लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts