Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • हमासच्या टॉप कमांडरचा खात्मा; इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा घेतला बदला
Top News

हमासच्या टॉप कमांडरचा खात्मा; इस्रायलने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा घेतला बदला

Israel Kills Head Of Hamas Military Wing | नुकतीच इस्त्रायलने (Israel) मोठी कारवाई केली आहे. इस्रायलने एका हवाई हल्ल्यात हमासच्या (Hamas) लष्करी शाखेचा प्रमुख इझ अल-दिन अल-हद्दादला (izz-al-din-haddad)  ठार केले आहे. याबाबत इस्रायली लष्कराने मोठा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या मोठ्या हल्ल्याची योजना आखणाऱ्या शेवटच्या काही उच्च कमांडरांपैकी अल-दिन अल-हद्दाद एक होता. तसेच आता त्याला इस्त्रायली लष्कराने ठार केल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे.

हेही वाचा – ओला-उबर-रॅपिडो बंद होणार? सरकारने बजावली नोटीस, दिला कडक इशारा

इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासच्या लष्करी शाखेच्या प्रमुखाचा मृत्यू

इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मागील शुक्रवारी गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अल-हद्दाद मारला गेला आहे. अल-हद्दाद हा हमासचा एक वरिष्ठ लष्करी रणनीतिकार होता, ज्याने ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमध्ये अंदाजे 1,200 लोकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि 250 हून अधिक इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. तर याच हल्ल्याचा बदला इस्त्रायलने घेत अल-हद्दादचा खात्मा केला आहे.

अल-हद्दादच्या कुटुंबीयांनी पुष्टी केली की, गाझामधील हल्ल्यात अल-हद्दादची पत्नी आणि मुलीसह इतर सहा जण ठार झाले आहेत. इस्रायलसोबतच्या युद्धात अल-हद्दाद यांचे दोन मुलगे आधीच मरण पावले होते. तर गेल्या शनिवारी गाझामधील एका कबरीत अल-हद्दादला दफन करण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान, त्यांचे पार्थिव हमास आणि पॅलेस्टिनी ध्वजांनी गुंडाळले होते. अल-हद्दादच्या मृत्यूनंचर हमासला जबर धक्का आहे.

दरम्यान, मोहम्मद सिनवारच्या मृत्यूनंतर अल-हद्दादने हमासच्या लष्करी शाखेची जबाबदारी स्वीकारली होती. तर इस्रायलने असा आरोप केला आहे की, युद्धादरम्यान अल-हद्दादने हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वारंवार इस्रायली ओलिसांचा ढाल म्हणून वापर केला होता.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts