Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ओला-उबर-रॅपिडो बंद होणार? सरकारने बजावली नोटीस, दिला कडक इशारा
Top News

ओला-उबर-रॅपिडो बंद होणार? सरकारने बजावली नोटीस, दिला कडक इशारा

Unauthorized Bike Taxi Services | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) अॅप्सवर कडक कारवाई केली आहे. तसेच सायबर विभागाने गूगल आणि ॲपलला उबर, ओला आणि रॅपिडो या राईड-हेलिंग कंपन्यांचे ॲप्स त्यांच्या संबंधित ॲप स्टोअरमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्या राज्य सरकारकडून आवश्यक परवानगी न घेता रस्त्यांवर बाईक टॅक्सी चालवत होत्या. राईड-हेलिंग कंपन्यांच्या या वर्तनाविरोधात सरकारने कठोर कारवाई केली आहे.

हेही वाचा – “साहेब आता तुम्हीच काहीतरी करा…”, अजित पवार गटाच्या आमदारांचे शरद पवारांना फोन, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबरक्राईम विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर परिवहन आयुक्त यांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे.

गूगल आणि ॲपल या दोघांनाही त्यांच्या डिजिटल मार्केटप्लेसमधून हे ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप्लिकेशन्स काढून टाकण्याचे आणि त्यांचा ॲक्सेस ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच असे निदर्शनास आले आहे की, काही ॲप आधारित प्लॅटफॉर्म हे वैध परवानगी, सरकारी मंजुरी किंवा परिवहन विभागाने घालून दिलेले नियम व कायदे आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन न करता बाईक टॅक्सीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सेवा चालवत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील बाईक टॅक्सी व्यवसायासंदर्भात या राईड-हेलिंग ॲप्सविरुद्ध एफआयआर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश सायबर विभागाला दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात ओला, उबर आणि रॅपिडोच्या सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts