Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “साहेब आता तुम्हीच काहीतरी करा…”, अजित पवार गटाच्या आमदारांचे शरद पवारांना फोन, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार
Top News

“साहेब आता तुम्हीच काहीतरी करा…”, अजित पवार गटाच्या आमदारांचे शरद पवारांना फोन, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार

Sharad Pawar | मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) काहीही सुरळीत चाललं नसल्याचं दिसत आहे. पक्षात अंतर्गत मतभेद होत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यातही मतभेद होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर पक्षातील आमदारांमध्येही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे या आमदारांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवारांना (Sharad Pawar) फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – NEET पेपरफुटीचं गूढ उलगडणार? मनीषा मांढरे CBI च्या ताब्यात, मोठा खुलासा होणार

अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवारांना का केला फोन?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांच्या हाती आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेत्यांना डावलण्यात आलं होतं. तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. अशातच आता राष्ट्रवादीतील काही आमदारांची अस्वस्थता वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या आमदारांनी शरद पवारांकडे मदत मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार गटाच्या काही आमदारांनी शरद पवारांसोबत संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. “साहेब आता तुम्हीच काहीतरी करा. सध्याच्या परिस्थितीत पक्षात राहणं कठीण झालं आहे, त्यामुळे तुम्ही काहीतरी करा”, अशी मागणी आमदारांनी शरद पवारांकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पक्षात अंतर्गत नाराजी वाढत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर सुनेत्रा पवार आणि अनेक बड्या नेत्यांमध्ये मतभेद झाल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts