Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

NEET पेपरफुटीचं गूढ उलगडणार? मनीषा मांढरे CBI च्या ताब्यात, मोठा खुलासा होणार

NEET Paper Leak Case | सध्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे (NEET Paper Leak Case) संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. तर आत्तापर्यंत या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये या प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीषा मांढरे (Manisha Mandhare) हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आरोपी मनीषा मांढरे हिला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – कलिंगड खाल्लं अन् जीवावर बेतलं! मुलाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबातील 5 जणांची प्रकृती गंभीर

मनीषा मांढरेची होणार चौकशी, NEET पेपरफुटीचं गूढ उलगडणार?

आरोपी मनीषा मांढरे हिची एनटीएने नीट परीक्षा प्रक्रियेतील तज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. मनीषाकडे वनस्पतीशास्त्र (Botany) आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे उपलब्ध होत्या. तर तपासात असे उघड झाले आहे की, मनीषाने विद्यार्थ्यांना शिकवणी देण्याच्या नावाखाली नोट्स पुरवल्या होत्या. याप्रकरणी सीबीआयने पुण्यातील मनीषा गुरुनाथ मांढरेला गेल्या शनिवारी दिल्लीतून अटक केली होती. तर आता दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आरोपी मनीषा मांढरे हिला 14 दिवसांची कोठडी सुनावली असून तिची चौकशी करण्यात येणार आहे.

NEET पेपर लीक प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पी.व्ही.कुलकर्णी, मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, यश यादव, दिनेश बिवल, मांगीलाल बिवल, विकास बिवल यांचा समावेश आहे. यातील बहुतेक आरोपींपैकी पाच महाराष्ट्रातील, तीन राजस्थानमधील आणि एक हरियाणाचा आहे. पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे पेपरफुटीसाठी जबाबदार होते, तर मनीषा वाघमारेने विद्यार्थ्यांना नीटचे पेपर वाटण्यात भूमिका बजावली होती.

मनीषा मांढरेने कसा रचला होता कट?

पुण्यात राहणाऱ्या मनीषा मांढरे या वनस्पतीशास्त्राच्या वरिष्ठ शिक्षिका आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मनीषा NEET 2026 परीक्षेसाठी NTA च्या वतीने अधिकृतपणे तज्ञ म्हणून सहभागी होत्या. NTA च्या तज्ञ पॅनेलच्या सदस्य म्हणून त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नपत्रिका थेट आणि पूर्णपणे उपलब्ध होत्या. तर 360 गुणांच्या प्रश्नपत्रिकेच्या या थेट उपलब्धतेचा फायदा घेऊन मनीषाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणले आहे.

तपासात अशी माहिती समोर आली आहे की, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनीषा मांढरेने परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटवण्याचा कट रचला होता. नीटची ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनीषा मांढरेने मनीषा वाघमारे हिच्यासोबत मिळून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यातील तिच्या घरी बोलावले. तिने त्यांच्यासाठी विशेष शिकवणी वर्ग घेतले. या गुप्त वर्गांमध्ये तिने त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न शिकवले आणि ते त्यांच्या वह्यांमध्ये लिहून घ्यायला लावले. तसेच नीट परीक्षा झाली तेव्हा मनीषा मांढरेने दिलेले बहुतेक प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत छापले होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना या विशेष वर्गांमध्ये बोलावण्यासाठी आणि त्यांना परीक्षेचे प्रश्न आगाऊ कळवण्यासाठी लाखो रुपये आकारण्यात आले होते.

दरम्यान, मनीषा मांढरेच्या पोलीस कोठडीत आता वाढ करण्यात आली असून लवकरच तिची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नवा काय खुलासा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts