Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला..
Top News

सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय, कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला..

Chocolate Boy Crying Video

Chocolate Boy Crying Video : शांत माणसाचा राग हा जगातला सगळ्यात खतरनाक राग असतो. होय, तामिळ सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय आणि सुपरस्टार ‘जयम रवी’ (Jayam Ravi) थेट कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला (cried in front of the camera)! ज्या अभिनेत्याने पडद्यावर शेकडो गुंडांना धूळ चारली, तो आपल्या खऱ्या आयुष्यातल्या वादळामुळे (The Storms of Life) पुरता कोलमडून गेलाय. पत्नी आरतीसोबतचा घटस्फोट, सायबर ट्रोलिंग आणि कथित प्रेयसी केनीशा फ्रान्सिससोबतचं नातं. या सगळ्यावर जयम रवीने चेन्नईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा काही बॉम्ब टाकलाय, ज्याने अख्खी दाक्षिणात्य सिनेसृष्टी (South Indian Film Industry) हादरली आहे.

हेही वाचा – Raja Shivajiचा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिसवर गाजलं, पाहा आतापर्यंत किती झाली कमाई!

चेन्नईत रवी मोहन म्हणजेच तमिळ चित्रपट श्रुष्टीतला चॉकलेट बॉय असलेला जयम रवी यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जयम रवीने घेतलेला निर्णय ऐकून त्याचे फॅन्स थक्क झालेत. रवीने जाहीर केलंय की, जोपर्यंत त्याचा घटस्फोट होत नाही, तोपर्यंत तो कॅमेऱ्यासमोर येणार नाही, म्हणजेच तो अभिनयातून ब्रेक घेतोय! रवी अत्यंत भावुक होऊन म्हणाला, गेल्या दोन वर्षांपासून जे काही सुरू आहे, त्याने माझं मानसिक संतुलन बिघडवलंय. मी सध्या काम करण्याच्या मनस्थितीत नाही. जेव्हा माझं आयुष्य या सगळ्या टेन्शन मधून बाहेर येईल तेव्हाच मी अभिनयात परत येईल. तेव्हाच फिल्म मध्ये काम करेन. रवीचा हा राग फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नव्हता, त्याचा थेट निशाणा होता त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबावर.

त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी बॉडीगार्ड्स ठेवले

मीडिया मुलाखतीदरम्यान रवी मोहन अनेक वेळा ढसाढसा रडताना दिसले. प्रेस कॉन्फरन्समध्ये रवी मोहन रडत म्हणाले की त्यांची एक्स पत्नी आरती त्यांना त्यांच्या मुलांना भेटू देत नाही. त्यांनी आरोप केला की त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी बॉडीगार्ड्स ठेवले गेले आहेत आणि त्यांना कुटुंबापासून पूर्णपणे दूर ठेवले गेले आहे. रवी मोहन म्हणाले कि “मी माझ्या पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले आणि आता त्याची किंमत मोजतो आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलांना भेटू शकत नाही.

लग्नानंतर सर्व आर्थिक निर्णय पत्नी आरतीच घेत असायची

त्यांनी त्यांच्या आर्थिक बाबींविषयीही काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी आरोप केला की लग्नानंतर सर्व आर्थिक निर्णय त्यांच्या पत्नी आरतीच घेत होत्या. अभिनेत्याने म्हटले की त्यांचे वैयक्तिक बँक खाते नव्हते आणि ते फक्त जॉइंट अकाउंट वापरत होते. त्यांनी सांगितले की ते थोडे पैसे काढले तरी लगेच त्यांना प्रश्न विचारले जात असत.

पत्नी आरतीच्या घरच्यांनी त्याला “गुलामासारखी” वागणूक दिली

या वादात आता ‘इगो’ आणि ‘इमोशन्स’चा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. रवीने आरोप केलाय की, अनेक वर्षांपासून त्याची पत्नी आरती आणि तिच्या घरच्यांनी त्याला “गुलामासारखी” वागणूक दिली आणि त्याचा मानसिक छळ केला. इतकंच नाही तर लग्न करण्यासाठी आरतीने नस कापण्याची धमकी दिली होती, त्यामुळेत्याने हे लग्न केलं आणि टिकवलं होतं. गेल्या दोन वर्षांत रवीने स्वतः आत्महत्येचा विचार केला होता, असा खळबळजनक खुलासा त्याने केलाय. पण तरीही व्यावसायिक बांधीलकी म्हणून तो दुसऱ्या दिवशी वेळेवर शूटिंगला पोहोचायचा.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts