• Home
  • राजकारण
  • उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप; 51 नेत्यांनी सोडली सपा-बसपाची साथ, केला ‘या’ पक्षात प्रवेश
Top News

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप; 51 नेत्यांनी सोडली सपा-बसपाची साथ, केला ‘या’ पक्षात प्रवेश

sapa bsp

Uttar Pradesh Politics | उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) राजकीय भूकंप झाला आहे. समाजवादी पक्ष (Samajwadi Party) आणि बहुजन समाज पक्षाला (BSP) मोठा धक्का बसला आहे. कारण समाजवादी पक्षाच्या आणि बहुजन समान पार्टीच्या 51 नेत्यांनी पक्षांची साथ सोडली आहे. तसेच या 51 नेत्यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षात (SBSP) प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते काळाच्या पडद्याआड; राजकीय वर्तुळात शोककळा

समाजवादी पक्ष आणि बीएसपीच्या 51 नेत्यांनी पक्षांची साथ सोडत सहुलदेव भारतीय समाज पक्षाला ते सामील झाले आहेत. या नेत्यांनी एसबीएसपीमध्ये प्रवेश केल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला.

ओम प्रकाश राजभर म्हणाले की, अखिलेश यादव हे पीडीएबद्दल कितीही घोषणाबाजी करोत सपा या जन्मात सरकार स्थापन करणार नाही. सध्या सपाची अवस्था अशी आहे की त्यांच्याकडे कोणताही हिशोब नाही, कोणतीही खातेवही नाही आणि अखिलेश जे काही म्हणतात तेच बरोबर असते, असं म्हणत ओम प्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

कोणत्या नेत्यांनी सोडली सपा आणि बसपाची साथ?

सपा पक्षातील रोशन सिंग, अतुल सिंग, अभिषेक सिंग, सुबोध कनौजिया, विशाल पांडे, पीयूष सिंग, अर्पित सिंग, रणविजय सिंग, राकेश सिंग, बजरंग सिंग, शिवम सिंग, विनय सिंग, अजय कुमार, प्रवीण सिंग आणि संतोष यादव सुभाष या नेत्यांनी सपा पक्षाची साथ सोडली आहे.

दुसरीकडे, बसपकडून संजीव सिंग, वैभव राय, प्रदीप सिंग, अर्जुन प्रताप सिंग, संजीव सिंग बंटू, बब्बन सिंग, दीपक सिंग, रोशन सिंग, अवनीश दुबे चंदन, कौशलेंद्र प्रताप सिंग, मनोज सिंग, शशी प्रकाश राय, विवेक सिंग, हृतिक दुबे, सतीश राय, सुमित दुबे, सतीश राय, शुक्ल राय यांची नावे आहेत. शिवम सिंग, राणा प्रताप सिंग, फरीद अहमद, रवींद्र राजभर, विवेक सिंग, अमन कांत सिंग, संतोष भारती, जितेंद्र सिंग, अविनाश सिंग, नीरज दुबे, आकाश मीरा, गोलू यादव, सूरज कुमार, सचिन कुमार, अंशू सिंग, मिथलेश यादव, निरंजन राजभर या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts