Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • प्रसाद लाड आणि मनोज जरांगे भेटीत भावनिक क्षण; मराठा आरक्षणावर चर्चा, नेमकं काय घडलं?
राजकारण

प्रसाद लाड आणि मनोज जरांगे भेटीत भावनिक क्षण; मराठा आरक्षणावर चर्चा, नेमकं काय घडलं?

Manoj Jarange

Manoj Jarange: भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज २२ मे रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संवाद साधण्यासाठी ही महत्वाची बैठक पार पडली.

मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना थेट अंतरवालीत येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ही भेट निश्चित झाली. दरम्यान, या भेटीपूर्वी घडलेल्या काही घटनांमुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते.

हेही वाचा: जेईई अ‍ॅडव्हान्स्ड रिस्पॉन्स शीट जाहीर, 25 मे रोजी येणार Answer Key; ‘या’ तारखेला लागणार निकाल

भेटीपूर्वी तणावपूर्ण वातावरण

छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना काही व्यक्तींनी तेथे घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. तसेच त्यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

मनोज जरांगे यांची भेट

यानंतर प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान प्रसाद लाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपले जुने मतभेद मान्य करत, समाजाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

‘मी भाऊ म्हणून आलोय’- प्रसाद लाड

प्रसाद लाड यांनी यावेळी आपण राजकारणी म्हणून नाही तर सामान्य नागरिक आणि समाजाचा भाग म्हणून आलो असल्याचे सांगितले. “समाजासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.

आरक्षण आणि मागण्यांवर चर्चा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये कुणबी प्रमाणपत्र, गुन्हे मागे घेणे, नोकरीसंदर्भातील निर्णय आणि विविध शासकीय योजना यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारकडे या मागण्या पोहोचवण्याची भूमिका प्रसाद लाड यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts