Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जळगाव विधान परिषद जागेसाठी महायुतीत चुरस; गुलाबराव पाटील की गिरीश महाजन, आता कोण गाजवणार मैदान?
Top News

जळगाव विधान परिषद जागेसाठी महायुतीत चुरस; गुलाबराव पाटील की गिरीश महाजन, आता कोण गाजवणार मैदान?

Jalgaon Legislative Council Seat: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ रिक्त जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचा (Vidhan Parishad Election 2026) बिगुल वाजल्यानंतर जळगाव मतदारसंघातील जागेवरून महायुतीतच राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्यात या जागेच्या वाटपावरून मतभेद समोर आले आहेत.

गुलाबराव पाटील यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद जागा शिवसेनेच्या कोट्यात यावी, अशी मागणी केली आहे. या जागेसाठी त्यांच्या मुलगा प्रतापराव पाटील यांचे नाव पुढे करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी पक्षाकडे आग्रह धरण्यात आला असून अंतिम निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेते घेतील आणि सर्व घटक पक्ष तो मान्य करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: पेट्रोल- डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक कार खरंच फायदेशीर? विक्रीच्या आकडेवारीतून समोर आले वास्तव

“जळगाव जागा भाजपचीच” – गिरीश महाजनांचा ठाम दावा

भाजप नेते गिरीश महाजन यांनी मात्र या जागेवर भाजपचा पारंपरिक अधिकार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील अनेक वर्षांपासून जळगाव विधान परिषद मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून पक्षाने येथे सातत्याने यश मिळवले आहे. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. तसेच या जागेसाठी भाजपमध्ये अनेक इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई–दिल्ली हालचालींवरून राजकीय टोलेबाजी

जागावाटपाच्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये हलकीफुलकी टोलेबाजीही पाहायला मिळाली. गुलाबराव पाटील मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठीसाठी गेले असताना, त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी उपरोधिक टिप्पणी केली.

महाजन म्हणाले की, जर गुलाबराव पाटील उमेदवारीसाठी मुंबईला जात असतील, तर आपणही तातडीने दिल्लीला रवाना होऊ. मात्र, आपण दिल्लीला वेगळ्या प्रशासकीय कारणासाठी जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर

दोन्ही नेत्यांनी महायुतीतील एकजूट टिकवण्यावरही भर दिला आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल आणि तो सर्वांना मान्य असेल, अशी भूमिका दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली आहे.

सध्या जळगाव विधान परिषद जागेवरून महायुतीतील ही रस्सीखेच चर्चेचा विषय ठरली असून पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts