Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला; अखेर ठराव सादरीकरणासाठी अंतिम मुदत जाहीर
ताज्या बातम्या

गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला; अखेर ठराव सादरीकरणासाठी अंतिम मुदत जाहीर

Gokul Dudh Sangh Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर अधिकृत सुरुवात झाली असून सहकार विभागाकडून आवश्यक कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. संघाशी संलग्न दूध संस्थांना 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दीर्घकाळ रखडलेल्या या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींना वेग आल्याने पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: IPL स्ट्रीमिंग महागात पडतंय? एक मॅच पाहण्यासाठी किती डेटा लागतो जाणून घ्या

 सर्किट बेंचने सर्व संस्थांची चौकशी

गोकुळ दूध संघातील 1300 हून अधिक संलग्न संस्थांच्या पात्रता आणि सुनावणी प्रक्रियेसंदर्भात वाद सुरू होता. कोल्हापूर सर्किट बेंचने सर्व संस्थांची चौकशी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुनावणीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या 90 दिवसांत निवडणूक घेण्याच्या निर्देशानंतर प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे. सध्या जवळपास 800 ते 900 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती आहे, तर उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निर्देशांनुसार

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, 26 मे ते 1 जून या कालावधीत संस्थांनी मतदार यादीसाठी आवश्यक पत्रव्यवहार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मतदार यादी प्रसिद्ध

ठराव सादर झाल्यानंतर दुग्ध निबंधक कार्यालयाकडून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर हरकती मागवून अंतिम मतदार यादी तयार केली जाईल. त्यानंतर निवडणुकीचा पुढील अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

या घडामोडींमुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून विविध गटांकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts