• Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदेंकडून धक्कातंत्र, निष्ठावंतांना डावलून ‘बविआ’च्या क्षितिज ठाकूरांनी तिकिट?
Top News

एकनाथ शिंदेंकडून धक्कातंत्र, निष्ठावंतांना डावलून ‘बविआ’च्या क्षितिज ठाकूरांनी तिकिट?

Kshitij Thakur Ticket News

Kshitij Thakur Ticket News : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने राज्यात राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आपापल्या पक्षाला जास्तीत जास्त मिळवण्यापासून ते उमेदवारी आणि इतर पक्षातील नेत्यांना आपल्या गळाला लावण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मोठी बातमी समोर आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मोठ्या धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत. आपल्या पक्षातील निष्ठावंतांना डावून विधानपरिषदेचे तिकिट इतर पक्षातील नेत्या आपल्याकडे घेऊन त्याला उमेदावारी देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी मोठी चाल खेळत राज्यातील आक्रमक आणि मासबेस असलेल्या नेता आपल्या पक्षात घेऊन त्यांनी विरोधकांसह भाजपला देखील शह देण्याची प्रयत्न केला. बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहारसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या या खेळीने त्यांनी अमरावती जिल्ह्यात मोठं राजकरण खेळल्याचे बोलले जात आहे. यानंतर शिंदे यांची भूक आणखीन वाढल्याचे दिसून येत आहे. आता या निवडणूकीत देखील त्यांनी दुसऱ्या पक्षातील मोठा नेता गळाला लावण्याचा पन केल्याचे दिसून येत आहे.

पक्ष वाढीसाठी एकनाथ शिंदेंनी कसली कंबर

आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई परिसरात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने वसई-विरारमधील बलाढ्य असलेल्या बहुजन विकास आघाडीला आपल्या पक्षात सामील करण्याची खेळी त्यांची केल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू रविंद्र पाठक यांना याबाबत निरोप घेऊन हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पाठवले आहे. त्यानंतर या गोष्टीला स्वतः पाठक नाकारले असले तरी, भेटीमागील दुसरं कोणतंही कारण सध्या तरी दिसत नाही.

बहुजन विकास आघाडी शिंदे गटात विलीन होणार?

बहुजन विकास आघाडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार का याविषयी शिवसेना नेते रवींद्र फटाक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याकडे महापालिका निवडणुकीवेळी वसई विरार आणि पालघरची जबाबदारी होती. मी पालघर जिल्ह्याचा संपर्कप्रमुख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. त्यामागे कोणताही राजकीय अर्थ लावू नये. विलीनीकरण हा मोठा विषय असल्याने त्याबद्दल मुख्य नेते एकनाथ शिंदेच बोलू शकतात, अशी प्रतिक्रिया रविंद्र फाटक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts