Abhijit Deepke: आज अमेरिकेतून थेट अभिजित दिपके दिल्लीत दाखल झाले. विमानतळावर उतरल्याबरोबर त्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक घेतलेले दिसले
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आज अमेरिकेहून भारतात परतले. दिल्ली विमानतळावर आगमनानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक हातात धरून माध्यमांसमोर उपस्थिती लावली.
पक्षाच्या वतीने आज दिल्लीतील जंतर- मंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात दीपके स्वतः सहभागी होणार असून तेच या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन राजधानीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा: पुरुषांमध्ये वाढतं पोट फक्त लठ्ठपणा नाही; ‘ही’ ठरू शकतात मुख्य कारणं
दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी दिली परवानगी
दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी आवश्यक परवानगी दिली असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक दिल्लीत दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
कायदोव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिल्ली पोलीस तसेच निमलष्करी दलातील जवानांची तैनाती करण्यात आली आहे. विमानतळापासून जंतर-मंतर परिसरापर्यंतच्या प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विमानतळाबाहेर दीपके यांच्या स्वागतासाठी समर्थकांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. त्यांच्या आगमनानंतर माध्यम प्रतिनिधींनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
या आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी प्रशासन आणि आयोजकांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.












