Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मध्यरात्री ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला कैलास पाटील; बंद दाराआड नेमकं काय चर्चा झाली?
राजकारण

मध्यरात्री ओमराजे निंबाळकरांच्या भेटीला कैलास पाटील; बंद दाराआड नेमकं काय चर्चा झाली?

Kailas Patil And Omraje Nimbalkar
Kailas Patil And Omraje Nimbalkar Meet Late at Night: मध्यरात्री कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली. मात्र, या अचानक झालेल्या भेटीमागे नेमके काय कारण होते आणि बंद दाराआड काय चर्चा झाली, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार पक्षांतर करू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर ओमराजेंची भूमिका काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. (Kailas Patil And Omraje Nimbalkar Meet Late at Night)

हेही वाचा: NEET 2026 Re-Exam: आज 22 लाख विद्यार्थी पुन्हा देणार परीक्षा; Air Forceने सुरक्षित पोहोचवले पेपर

ठाकरे गट

याच घडामोडींच्या दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यातील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी उशिरा रात्री भेट घेतली. जवळपास एक तास या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मात्र ही भेट राजकीय हेतूने नसून मैत्रीच्या नात्याने आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी झाल्याचे दोन्ही आमदारांनी स्पष्ट केले आहे.

कैलास पाटील यांचे स्पष्टीकरण

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना कैलास पाटील म्हणाले की, ओमराजे निंबाळकर यांनी गेली दोन दशके ज्या प्रकरणासाठी संघर्ष केला, त्या संदर्भातील घडामोडींवरही चर्चा झाली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन आपण त्यांना भेटण्यासाठी आलो होतो, असे त्यांनी सांगितले.

ओमराजे पक्षासोबतच राहतील का? (Omraje Nimbalkar)

ओमराजे निंबाळकर यांना पक्षात कायम ठेवण्याच्या प्रयत्नांबाबत विचारले असता, कैलास पाटील यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ओमराजेंच्या मनात असलेली भावना पूर्वीप्रमाणेच कायम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ओमराजे भविष्यातही पक्षासोबत राहतील, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता ओमराजेंनी विचार करण्यासाठी काही दिवसांचा अवधी मागितल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांत ते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (LS Marathi News Channel)

शिंदे गटालाही सकारात्मक संकेत (Shinde Group)

दुसरीकडे, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनाही ओमराजे निंबाळकर आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट असून ते पक्षाशी जोडलेले राहतील, असा विश्वास आहे. मात्र, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा करण्याचा विचार ओमराजे करत असल्याचे सांगितले जात आहे.

राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क रंगत असले तरी, ओमराजे निंबाळकर यांचा अंतिम निर्णय काय असेल, याबाबतची उत्सुकता अद्याप कायम आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts