Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा अन् दुसऱ्याच दिवशी मोदी भेटीला; नेमकं शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?
Top News

जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांना पाठिंबा अन् दुसऱ्याच दिवशी मोदी भेटीला; नेमकं शरद पवारांच्या भेटीमागचं कारण काय?

Sharad Pawar Meets Modi
Sharad Pawar Meets PM Mod:  मंगळवारी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर आज (बुधवार) शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, भेटीमागचे नेमके कारण काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीतील राजकीय घडामोडींमध्ये बुधवारी एक महत्वाची भेट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाना सुरुवात झाली आहे.

यापूर्वी शरद पवार यांनी जंतर- मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. नीट परीक्षेतील गैरप्रकारच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पवारांची मोदींसोबत झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपुरात राजभवनासमोर काँग्रेसचे आंदोलन

या भेटीमागे नेमकं कारण काय?

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी (Sharad Pawar Meets Modi) यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि संवादाचा मार्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने ही भेट घेतली असावी.

पवार यांनी याआधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांचा आवाज ऐकून घेतला होता. त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चा होऊन योग्य मार्ग निघावा, यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Latest Political News)

शेतकरी प्रश्नांवरही मोदींसोबत चर्चा

दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी, कृषी क्षेत्रातील समस्या आणि जलव्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे मांडण्यात आले आहेत.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, पीडित कुटुंबांना मदत, सिंचन प्रकल्पांना गती आणि पाणी व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रासाठी विविध मागण्या

शरद पवार यांनी किमान आधारभूत किंमत (MSP) व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच पीक विमा योजनेतील अडचणी दूर करून नुकसानभरपाई वेळेत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts