Gas Cylinder Water : आखाती देशातील तणावाच्या परिस्थितीमुळे भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहे..जानेवारी महिन्यात देशात घरगुती गॅस सिलेंडरचे दर 853 रुपयांच्या जवळ जवळ होते…तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 1,691 रुपयांच्या जवळ जवळ होते..पण आखाती देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली..आणि याचा मोठा परिणाम भारतावर पाहायला मिळाला…भारतात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा पाहायला..तसंच गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याच्या पाहायला मिळाल्या…यानंतर सरकारने इंधन दरवाढ करण्याचे ठरवले…सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवून 942 रुपये केले…तर व्यावसायिक सिलेंडरचे दर थेट 1 हजार रुपयांनी वाढवून 2,738 रुपये करण्यात आले…असं असताना गॅस सिलेंडरमध्ये चक्क पाणी निघत असल्याची घटना समोर आली आहे…लातूरमध्ये एका व्यक्तीने खरेदी केलेल्या गॅस सिलेंडरमध्ये तब्बल 4 लिटर पाणी निघाल्याचा आरोप आहे…याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे..त्यामुळे पाहूयात की गॅस सिलेंडरमध्ये पाणी का निघत आहे? गॅस सिलेंडर महाग असल्याने त्यामध्ये पाणी मिसळून विकले जात आहे का? ही घटना फक्त लातूरमध्येच घडली आहे की इतर ठिकाणी देखील घडली आहे?
गॅस सिलेंडरमध्ये 4 लिटर पाणी? लातूरमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ ( Gas Cylinder Water )
गॅस सिलेंडर हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे…जर गॅस सिलेंडर संपला तर घरात जेवण देखील बनत नाही…गावाकडे तरी सिलेंडर संपल्यानंतर चूल पेटवून जेवण बनवता येते..पण शहरात सिलेंडर शिवाय दिवस जाऊच शकत नाही…त्यामुळे कामगार, नोकरदार आणि इतर लोक पैसे असले-नसले तरी पहिले गॅस सिलेंडर घेऊन येतात…काही दिवसांपूर्वी जेव्हा इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू होते…तेव्हा भारतात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता…यावेळी नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी दिवसभर रांगेत उभं राहावं लागत होतं…यावेळी काही जण घरगुती सिलेंडर ब्लॅकमध्ये थेट 4000 रुपयांना विकत होते..नागरिकांकडे दुसरा काही पर्याय नसल्याने त्यांना ते 4 हजार रुपये देऊन खरेदी करावे लागत होते…आता आखाती देशातील तणाव कमी झाल्याने सध्या सिलेंडर तर सगळीकडे मिळत आहे..पण काही ठिकाणी अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी चक्क सिलेंडरमध्ये पाणी भरून विकले जात असल्याचा आरोप आहे…
हेही वाचा : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी 5 मोठे नियम लागू; पाहा काय झाले
लातूरमध्ये गॅस सिलेंडरमधून पाणी कसे निघाले? ( Gas Cylinder Water )
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा या ग्रामीण भागातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे… मकसूद अन्सारी यांनी नेहमीप्रमाणे अधिकृत इंडेन गॅस एजन्सीमधून घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर खरेदी केला होता.. हा सिलेंडर घरी जोडल्यानंतर काही दिवसांतच त्यामधील गॅस अचानक संपल्याचे त्यांच्या निदर्शनास आले… सामान्यतः घरगुती गॅस सिलेंडर महिना ते दीड महिना सहज चालतो, मात्र हा सिलेंडर अत्यंत कमी कालावधीत रिकामा झाल्यामुळे अन्सारी यांच्या मनात काही शंका आल्या… त्यांनी या तांत्रिक अडचणीचे कारण शोधण्यासाठी सिलेंडर शेगडीपासून वेगळा केला आणि तो उचलून हलवून पाहिला… सिलेंडर हलवल्यानंतर पाण्यासारखं काही तरी असल्याचे समजले… हा प्रकार अत्यंत संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या सिलेंडरची सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
ग्राहकाने नेमका काय दावा केला? ( LPG Cylinder )
त्यानंतर मकसूद अन्सारी यांनी सिलेंडर उलटा करून त्यामधील द्रव पदार्थ एका भांड्यात काढण्यास सुरुवात केली… त्यावेळी सिलेंडरमधून गॅसऐवजी चक्क स्वच्छ पाणी बाहेर पडू लागले… हे पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वच नागरिकांना धक्का बसला… संपूर्ण सिलेंडर रिकामा केल्यानंतर त्यामधून तब्बल 4 लिटर पाणी बाहेर आल्याचा दावा अन्सारी यांनी केला..त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला…गॅस सिलेंडरमधून पाणी बाहेर पडत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे… हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केवळ भादा गावातच नव्हे तर संपूर्ण औसा तालुक्यात आणि लातूर जिल्हाभरात नागरिकांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.. एका नामांकित आणि सरकारी मान्यताप्राप्त गॅस कंपनीच्या सिलेंडरमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी आढळल्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक फसवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे… संबधित ग्राहकाने या गंभीर निष्काळजीपणाबद्दल आणि फसवणुकीबद्दल इंडेन गॅस कंपनीच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या वितरण व्यवस्थेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे…
इंडेन गॅस कंपनीची प्रतिक्रिया काय? ( Indane Gas Cylinder )
या संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडिया आणि जिल्हाभरात चर्चा सुरू झाल्यानंतर इंडेन गॅस कंपनीच्या वरिष्ठ प्रशासनाला अखेर या घटनेची दखल घ्यावी लागली… या संदर्भात इंडेन गॅस (Indane Gas ) कंपनीचे विभागीय अधिकारी वीरेंद्र अहिरवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली अधिकृत बाजू स्पष्ट केली आहे… अधिकारी अहिरवार यांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना आणि ग्राहकाचा आरोप आमच्या निदर्शनास आला आहे…गॅस सिलेंडरच्या आत अशा प्रकारे पाणी निघण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना असून, माझ्या संपूर्ण सेवाकाळात अशी घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही… गॅस रिफिलिंग प्लांटमधून सिलेंडर भरताना अत्यंत कडक तांत्रिक निकष पाळले जातात.. त्यामुळे प्लांट स्तरावर अशी चूक होणे अशक्यप्राय आहे… तरीही हा प्रकार नेमका कुठे आणि कसा घडला, याबाबत कंपनीमार्फत संपूर्ण माहिती घेतली जाईल आणि त्याची पाळेमुळे शोधली जातील… ग्राहकाचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी सदरील ग्राहकास तात्काळ दुसरा नवीन गॅस सिलेंडर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले…
इंडेन गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि भादा येथील गॅस एजन्सी मालकांशी संपर्क केला आहे.. हा प्रकार नेमका कसा घडून आला? हा एकच प्रकार जिल्ह्यातला आहे का की इतर ठिकाणीही असे काही प्रकार आहेत? याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाईल असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी व्यक्त केले आहे…त्यामुळे आता सिलेंडरमधून पाणी निघण्याचा प्रकार फक्त एकाच ठिकाणी घडला आहे की इतर ठिकाणीही घडला आहे, याबाबत माहिती समोर येणे महत्त्वाचे आहे…या गैरप्रकराप्रकरणी कुणावर करवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…
FAQs
1. गॅस सिलेंडरमध्ये 4 लिटर पाणी कुठे आढळले?
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा येथे ग्राहकाने गॅस सिलेंडरमधून 4 लिटर पाणी निघाल्याचा दावा केला आहे.
2. कोणत्या कंपनीच्या सिलेंडरबाबत हा दावा करण्यात आला?
इंडेन (Indane) गॅस सिलेंडरबाबत हा दावा करण्यात आला आहे.
3. इंडेन कंपनीने काय प्रतिक्रिया दिली?
कंपनीने ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगत चौकशी सुरू केली असून संबंधित ग्राहकाला नवीन सिलेंडर देण्याची माहिती दिली आहे.
4. गॅस सिलेंडरमध्ये पाणी असणे सामान्य आहे का?
नाही. गॅस सिलेंडरमध्ये अशा प्रकारे पाणी असणे सामान्य नाही. याबाबत तांत्रिक तपासणी आवश्यक असते.
5. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे का?
होय. संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.









