• Home
  • संस्कृती
  • यंदा १२ ऑगस्टला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; ‘या’ राशींच्या व्यक्तींनी राहावे सावध!
राशी भविष्य

यंदा १२ ऑगस्टला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; ‘या’ राशींच्या व्यक्तींनी राहावे सावध!

Surya Grahan 2026
61
Surya Grahan 2026: यंदा १२ ऑगस्ट रोजी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार या ग्रहणाचा काही राशींवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.

यंदा २०२६ मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट २०२६ (Surya Grahan 2026) रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात काही राशींवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडू शकतो, असे मानले जाते. त्यामुळे या कालावधीत काही राशींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कोणत्या राशींच्या जातकांनी सावध राहण्याची गरज आहे, जाणून घेऊया.

मेष राशी (Mesh Rashi)

सूर्यग्रहणाचा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी काहीसा तणावपूर्ण ठरू शकतो. कोणतेही महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

हेही वाचा: LS मराठी Top 5, 10 August 2026 : आजच्या ताज्या बातम्या, Breaking News; वाचा सकाळच्या बुलेटिनमधील टॉप हेडलाईन्स

कर्क राशी (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांना या काळात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका आणि पैशांचा वापर विचारपूर्वक करा. (Surya Grahan 2026)

मकर राशी (Makar Rashi)

मकर राशीसाठी ग्रहणाचा कालावधी मानसिक दबाव वाढवणारा ठरू शकतो. तणावाच्या परिस्थितीत मोठे निर्णय घेणे टाळा. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये अधिक दक्षता आवश्यक आहे. कामाचा ताण वाढल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणे महत्त्वाचे ठरेल. (Latest Lokshevay News)

भारतात दिसणार नाही सूर्यग्रहण

दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजून 4 मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. ग्रहणाची समाप्ती 13 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी होणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

टीप: वरील राशींवरील परिणाम हे ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहेत. याला वैज्ञानिक पुरावा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts