Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आईच्या घरी ओणम सेलिब्रेशनसाठी हर्ष मेहता पोहोचल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यामुळे मलायका दुसऱ्यांदा लग्न करणार का, असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora boyfriend)पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. फायमंड व्यावसायिक हर्ष मेहता यांच्यासोबत तिच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. आता ओणमच्या निमित्ताने हर्ष मलायकाच्या कुटुंबीयांसोबत दिसल्याने या चर्चाना आणखी हवा मिळाली आहे. त्यामुळे मलायका दुसऱ्यांदा लग्नाच्या तयारीत आहे का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: Metaचा मोठा निर्णय! Instagram-Facebook दिवसातून फक्त २ तास वापरता येणार; वाचा नवे नियम
ओणम सेलिब्रेशनमध्ये हर्षची उपस्थिती
२६ ऑगस्ट रोजी मलायकाने तिच्या आई जॉयस अरोरा यांच्या घरी ओणम साजरा केला. याचदरम्यान हर्ष मेहता तिथे उपस्थित असल्याचं समोर आलं. हर्षचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचं लक्ष पुन्हा मलायका आणि हर्ष यांच्या नात्याकडे गेलं.
विशेष म्हणजे, कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा हर्षाचा प्रयत्नही व्हिडीओमध्ये दिसून आल्याचं वृत्त आहे. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्यांच्या नात्याबाबत विविध अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली.
‘लग्न कधी?’ नेटकऱ्यांचा सवाल
हर्षचा मलायकाच्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. काही यूजर्सनी दोघांचं नातं पुढच्या टप्प्यावर पोहोचल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी थेट लग्नाबाबत प्रश्न विचारले.
मात्र, मलायका किंवा हर्ष यांनी लग्नाबाबत (Malaika Arora – Harsh Mehta marriage) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या चर्चा केवळ सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहेत.
याआधीही मंदिरात एकत्र दिसले होते
मलायका आणि हर्ष यांना यापूर्वीही एकत्र पाहण्यात आलं आहे. मार्च 2026 मध्ये दोघे राजस्थानमधील नर्लई येथील आदिनाथ जैन मंदिरात एकत्र दिसले होते. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली होती.
याशिवाय दोघांना यापूर्वीही काही सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
मलायकाचं पहिलं लग्न आणि घटस्फोट
मलायका अरोराने (Malaika Arora latest news) पाहिलं लग्न हे अभिनेता अरबाज खान यांच्यासोबत केलं होतं. दोघांनी 1998 मध्ये विवाह केला. या नात्यातून त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट झाला. यानंतर मलायकाचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं गेलं. दोघांचं नातं अनेक वर्षे चर्चेत राहिलं; मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
खरंच दुसरं लग्न होणार?
हर्ष मेहता यांच्यासोबत मलायकाच्या वाढत्या जवळिकीच्या चर्चा सध्या जोरात आहेत. कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी हर्षची उपस्थिती आणि यापूर्वीच्या सार्वजनिक भेटी यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
पण लग्नाची तारीख, साखरपुडा किंवा विवाहाबाबत मलायका आणि हर्षकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी ‘मलायका दुसऱ्यांदा संसार थाटणार’ या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. आता मलायका आणि हर्ष त्यांच्या नात्याबाबत स्वतः कधी खुलासा करतात, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.



