Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी फडणवीसांनी दिली ‘इतक्या’ महिन्यांची मुदत
ताज्या बातम्या

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी फडणवीसांनी दिली ‘इतक्या’ महिन्यांची मुदत

Marathi Language Rule
4
Marathi Language Rule: अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जुजबी मराठी शिकण्यासाठी आता त्यांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Maharashtra auto drivers) राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना आता आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चालकांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली.

चालकांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. वेगवेगळ्या वयोगटातील चालकांना कमी कालावधीत भाषा शिकणं कठीण असल्याचं शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईत धक्कादायक घटना! 10व्या मजल्यावरून नवविवाहितेने मारली उडी, पण…; वाचा पुढे काय घडलं?

वर्षभर कारवाईपासून दिलासा

या मुदतवाढीमुळे संबंधित अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील एक वर्ष त्यांना मराठी शिकण्यासाठी वेळ मिळणार असून, या कालावधीत केवळ भाषा न आल्याच्या कारणावरून कारवाई केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. चालकांनी या संधीचा उपयोग करून आवश्यक तेवढी मराठी भाषा शिकावी, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं.

क्लासेस आणि साहित्याच्या माध्यमातून मराठी शिकवणार

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याची तयारी चालक संघटनांकडून दर्शवण्यात आली आहे. मराठीचे वर्ग, अभ्यास साहित्य आणि इतर माध्यमांतून चालकांना जुजबी मराठीचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना आवश्यक असलेलं मराठी संभाषण चालकांना करता येईल, अशी अपेक्षा आहे.

चालकांचं म्हणणं काय?

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान चालकांच्या प्रतिनिधींनी जुजबी मराठी शिकण्याच्या नियमाला विरोध नसल्याचं सांगितलं. मराठी शिकण्याची तयारी असून त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी त्यांची भूमिका होती.

चालकांच्या या मागणीचा विचार करून राज्य सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यामुळे आता पुढील काळात अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकण्यावर किती भर देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts