Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • सुप्रिया सुळेंकडे OBC प्रमाणपत्र? वडेट्टीवारांच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ
राजकारण

सुप्रिया सुळेंकडे OBC प्रमाणपत्र? वडेट्टीवारांच्या दाव्याने महाविकास आघाडीत खळबळ

Supriya Sule OBC Certificate
5

Supriya Sule OBC Certificate: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र, काही वेळातच वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळेंचं नाव अनावधानाने घेतल्याचं सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार आणि एमपीएससीवर टीका केली. आयोगातील कारभारावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवरही आरोप केले.

हेही वाचा: मुंबईत धक्कादायक घटना! 10व्या मजल्यावरून नवविवाहितेने मारली उडी, पण…; वाचा पुढे काय घडलं?

याचदरम्यान ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. याच वक्तव्यात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही उल्लेख केल्याने राजकीय वादाला तोंड फुटलं.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया दिली. आपल्या नावाबाबत करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं सांगत त्यांनी वडेट्टीवारांकडे पुरावे जाहीर करण्याची मागणी केली.

आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला जात असेल, तर त्यासंदर्भातील कागदपत्रं सार्वजनिक करावीत आणि आरोप सिद्ध करावा. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी भूमिका सुळे यांनी मांडली.

राष्ट्रवादीही आक्रमक

या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस नेते गेल्या काही दिवसांपासून अशी वक्तव्य का करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच अशा प्रकारे आरोप-प्रत्यारोप होत असतील, तर याचा परिणाम आघाडीवर होऊ शकतो, असा इशाराही शिंदे यांनी दिला. पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करणं सोपं नसल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसला सुनावलं.

वडेट्टीवारांनी दिलं स्पष्टीकरण

राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांचा सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असं सांगत त्यांनी या उल्लेखाबद्दल खेद व्यक्त केला.

मात्र, ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबतची आपली भूमिका कायम असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचं त्यांनी म्हटलं.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आधीच संवेदनशील बनला आहे. अशा परिस्थितीत एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं, तरी या प्रकरणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संबंधांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आता वडेट्टीवारांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद इथेच थांबतो की आगामी काळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts