Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठ्यांनो, आजपासून १२ सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईकडे निघा; मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, पुढचा प्लॅन काय?
राजकारण

मराठ्यांनो, आजपासून १२ सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईकडे निघा; मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, पुढचा प्लॅन काय?

Manoj Jarange Patil Antarwali Sarati Live
57
Manoj Jarange Patil Antarwali Sarati Live: आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, त्यांनी थेट मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. “१२ तारखेपर्यंत मुंबईला जा,” असं आवाहन करत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील रणनीतीही स्पष्ट केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. अंतरवाली सराटी येथून संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. आजपासून १२ सप्टेंबरपर्यंत आपल्या सोयीनुसार मुंबईच्या दिशेने जाण्यास त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; टोलच्या बदल्यात सुविधांचा अभाव?

टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचे आवाहन

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Latest News)  यांनी आंदोलकांनी एकाच वेळी मोठ्या संख्येने मुंबईत (Maratha protest Mumbai) दाखल होण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचे आवाहन केले. मुंबईच्या जवळपास पोहोचता येईल तिथपर्यंत जाण्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्याकडे थेट जाण्याचे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकडे जाताना वाहनांवर आंदोलनाचे झेंडे लावू नका, असे आवाहनही जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil hunger strike) यांनी केले. पोलिसांना कोणताही त्रास होऊ नये आणि विनाकारण संशय निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.

१२ सप्टेंबरपर्यंत मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याचा सल्ला

दरम्यान, पोलिसांनी एखाद्या आंदोलकाला ताब्यात घेतल्यास घाबरून न जाता शांतपणे पोलिस ठाण्यात राहावे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच १२ सप्टेंबरपर्यंत नातेवाईक किंवा मित्रांकडे राहण्याची व्यवस्था करून मुंबईच्या दिशेने पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

“मराठे मुंबईत आले आहेत, हे कुणाला कळता कामा नये,” असा उल्लेख करत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली. मात्र, त्याचवेळी पोलिसांना त्रास देण्याचा आपला उद्देश नसल्याचेही त्यांनी सांगितले. ( Jarange Patil Breaking News)

तोडगा निघेपर्यंत उपोषण सोडणार नाही

सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रतिनिधीने संपर्क साधलेला नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. सरकारकडून तोडगा निघेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली असून, मुंबईकडे जाण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलनाची दिशा काय राहणार आणि सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts