Rahul Gandhi Nashik Visit: राहुल गांधी आज नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज, २ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिकमध्ये दाखल (Rahul Gandhi Nashik Visit) झाले आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्याला राजकीय वातावरणाचीही जोड मिळाली असून, त्यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी नाशिकमधील नियोजित शिबिराच्या दिशेने रवाना झाले असून, या दौऱ्यात ते आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
भाजपकडून रास्तारोको आंदोलन
दरम्यान, राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर (Women Reservation Bill) भाजपकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसह नाशिकच्या महापौर आणि आमदार देवयानी फरांदे सहभागी झाल्या. यावेळी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Nashik Political News)
हेही वाचा: वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका, ‘या’ गंभीर आजाराचा संकेत असू शकतो
भाजपने काँग्रेसवर ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध केल्याचा आरोप केला आहे. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी ५० टक्के आरक्षणाची मागणी आणि त्यासंदर्भातील काँग्रेसची भूमिका यावरून भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य केले. महिलांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने विरोध का केला, असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला.
‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाबाबत राहुल गांधी
दरम्यान, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाबाबत राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाच्या उद्देशाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच आरक्षण लागू करण्याच्या तरतुदीला त्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच ओबीसी महिलांना महिला आरक्षणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. याच मुद्द्यावरून भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधत नाशिकमध्ये आंदोलन केले.
एकीकडे राहुल गांधी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी नाशिकमध्ये (Nashik Latest News) आले असताना दुसरीकडे भाजपच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याकडे राजकीयदृष्ट्याही लक्ष लागले आहे.









