Bhagwangad Well Water : बीडच्या भगवानगडाच्या पायथ्याशी निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळालाय…कालपर्यंत कोरडी असलेली विहीर अचानक पाण्याने भरली आहे….दुष्काळी बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस बरसला नाही…त्यामुळे पिकं पाण्याअभावी माना खाली टाकत आहे…शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत…तसंच शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे….पण असं असताना घोगस पारगाव शिवारात भगवानगडाच्या मालकीच्या जागेतील एक कोरडी विहीर अचानक पाण्याने तुडुंब भरली आहे… विशेष म्हणजे या विहिरीपासून अवघ्या शंभर फुटांवर असलेल्या इतर विहिरी मात्र अक्षरशः कोरड्या ठाक आहेत… त्यामुळे या विहिरीला अचानक पाणी आले तरी कुठून? हा निसर्गाचा चमत्कार आहे की भगवान बाबांचा आशीर्वाद? अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
भगवानगडाच्या पायथ्याशी अचानक विहिरीत पाणी ( Bhagwangad Well Water )
सध्या महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे…त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय…शेतकरी रोज देवाकडे पाऊस पडू दे म्हणून प्रार्थना करताना दिसत आहे…शेतात गेल्यानंतर शेकऱ्यांना आपल्या डोळ्यासमोर पिकं वाळताना पाहवत नाहीये….अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात देखील आहे…बीड पहिलेच कामगारांचा, उसतोड करणाऱ्यांचा जिल्हा आहे…याच बीडमध्ये पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे… पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे…पण असं असताना 1 सप्टेंबर रोजी संत भगवान बाबांच्या जयंती सोहळ्याच्या दिवशीच भगवानगडाच्या मालकीच्या जागेतील एक कोरडी विहीर अचानक पाण्याने भरल्याचे सांगितले जात आहे… त्यामुळे भाविकांमध्ये या घटनेबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले असून, विहिरीतील पाणी पाहण्यासाठी नागरिक आणि भाविकांची गर्दी होत आहे.
हेही वाचा : गणपतीसाठी कोकणात जाणार असाल तर मोठी बातमी! 173 एसटी बस
चमत्कार की भूगर्भातील पाण्याचा स्रोत? ( Bhagwangad News )
भगवानगडावर ( Bhagwangad ) यापूर्वी पाणीटंचाईची परिस्थिती होती… मंदिराच्या बांधकामासाठीही पाणी कमी पडत होते… मात्र आता या विहिरीला पाणी आल्याने गडावरील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची आशा व्यक्त केली जात आहे… दरम्यान, याच विहिरीपासून अवघ्या शंभर फुटांवर असलेल्या दुसऱ्या विहिरीतील पाणी तळाला गेलेलं असताना, एकाच विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी कसं आलं? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे…बीड जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले, ओढे आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत डोंगराच्या पायथ्याशी अचानक तुडुंब भरलेली ही विहीर चर्चेचा विषय बनली आहे…
भगवानगडाच्या पायथ्याशी अचानक कोरडी विहीर भरल्याची माहिती वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली आहे…त्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी विहीर पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे…अचानक विहिरीत पाणी आलाच कसा असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे…अनेक जण याला चमत्कार म्हणत आहे…मात्र या घटनेमागे नेमकं भूगर्भीय कारण काय आहे? पाण्याचा अचानक स्रोत निर्माण झाला कसा? याचा शास्त्रीय उलगडा होणं गरजेचं आहे… त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी घटनास्थळी पाहणी करून या पाण्याचं नेमकं गूढ स्पष्ट करावं, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे…









