Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सांगवीत दहीहंडीचा लोखंडी सांगाडा अंगावर पडून महिलेचा मृत्यू. मुंबईतही दहीहंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदाचा मृत्यू
Pune

सांगवीत दहीहंडीचा लोखंडी सांगाडा अंगावर पडून महिलेचा मृत्यू. मुंबईतही दहीहंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदाचा मृत्यू

Pune Dahi Handi Accident
18

Pune Dahi Handi Accident : राज्यात सध्या दहीहंडीचा उत्साह सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे…मुंबई, ठाणे , पुण्यासह राज्यभरात गोविंदा दहीहंडीचा थर लावताना पाहायला मिळत आहे…काही ठिकाणी तर मोठं मोठे सेलिब्रिटी दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे…पण असं असताना काही ठिकाणी मात्र दुर्घटना घडताना दिसत आहे…

मुंबईत दहीहंडीच्या उत्सवादरम्यान आतापर्यंत 22 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे…तर पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे….जुन्या सांगवी भागात दहीहंडीचा उत्सवातील लोखंडी सांगाडा पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय…आनंदाच्या दिवशीच जुन्या सांगवीत आक्रोश पसरला आहे…पु्ण्यानंतर मुंबईतही 7 वर्षीय गोविंदाचा खांब कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय….दहीहंडी फोडताना विटांचा खांब कोसळल्याची माहिती आहे…मालवणीत दहीहंडी दरम्यान दुर्घटना घडलीये…त्यामुळे आता थर लावताना आणि दहीहंडी फोडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे…

दहीहंडीच्या उत्साहाला दुर्घटनांचे गालबोट ( Pune Dahi Handi Accident )

जुन्या सांगवीत दहीहंडाचा ( Dahi Handi ) उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आला होता…सर्वत्र आनंदाचे वातावरण होते…रात्री दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झाला…दहीहंडीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री आकराच्या सुमारास जेव्हा विघ्नहर्ता मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते…यावेळी अचानक एक अवजड भाग अचानक खाली उभ्या असणाऱ्या महिलेच्या थेट डोक्यात जाऊन पडला…या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला…सलमा सलाउद्दीन पठाण ( Salma Pathan ) असं मृत महिलेचं नाव आहे… विशेष म्हणजे मृत सलमा यांचा मुलगा स्वतः याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे, ज्यामुळे या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण घटनेत सर्वात हृदयस्पर्शी आणि वेगळी बाब म्हणजे मृत सलमा पठाण यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली. मात्र, जेव्हा ही बाब पठाण कुटुंबीयांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी या प्रकरणाला एक वेगळे वळण दिले… मृत सलमा यांचा तरुण मुलगा हा दुर्घटना घडलेल्या विघ्नहर्ता मित्र मंडळाचाच एक हक्काचा आणि सक्रिय कार्यकर्ता आहे. दहीहंडीचे नियोजन आणि त्यानंतर साहित्य गोळा करण्याच्या कामात तो स्वतः त्याच्या मित्रांसोबत व्यस्त होता… त्यामुळे मंडळात काम करणारे इतर सर्व तरुण हे त्यांच्या मुलाचे मित्र आणि परिसरातील परिचयाचेच मुले आहेत… आपल्या घरात एवढा मोठा आघात झाला असताना आणि आईचे छत्र हरपले असतानाही, पठाण कुटुंबीयांनी अत्यंत संयम आणि समजूतदारपणा दाखवला… हा एक निव्वळ अपघात होता आणि कोणाचाही कोणाला मारण्याचा किंवा दुखापत करण्याचा हेतू नव्हता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली… आमचा स्वतःचा मुलगा त्या मंडळात काम करत होता आणि जर आम्ही गुन्हा दाखल केला, तर मंडळातील इतर निष्पाप तरुण मुले, जे आमच्या मुलाचे मित्र आहेत, त्यांचे करिअर आणि भविष्य अडचणीत येईल, अशी अत्यंत भावनिक भूमिका कुटुंबीयांनी घेतली..

हेही वाचा : राऊतांना तुरुंगात विष दिलं जात होतं ? राहुल गांधींचा Toxic Test चा सल्ला

पोलिसांकडे कारवाईबाबत लेखी विनंती ( Mumbai Govinda Death )

कुटुंबीयांनी केवळ मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला नाही, तर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लेखी विनंतीही केली आहे. कायद्यानुसार अशा गंभीर अपघातांच्या प्रकरणात जर नातेवाईक तक्रार देण्यास पुढे आले नाहीत, तर पोलीस स्वतःहून फिर्यादी बनून गुन्हा दाखल करू शकतात. पठाण कुटुंबीयांनी पोलिसांना विनंती केली आहे की, कृपया पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून कोणताही गुन्हा दाखल करू नये… सणाच्या कामात अनवधानाने झालेली ही चूक असून, यामुळे इतर कोणत्याही कुटुंबातील तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, हीच आमची इच्छा आहे. एका आईला गमावल्यानंतरही इतर मुलांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या या पठाण कुटुंबीयांच्या भूमिकेने पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकही भारावून गेले आहेत…

दहीहंडी ( Dahi Handi ) उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी स्ट्रक्चर, कमानी आणि इतर साहित्य उभारलं जातं.. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर हे स्ट्रक्चर उतरविताना सुरक्षेच्या उपाययोजनांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे… संबंधित परिसरात नागरिकांची वर्दळ असताना लोखंडी कमान किंवा रॉड उतरविण्याचं काम सुरू असल्यास अशा प्रकारच्या दुर्घटनांचा धोका निर्माण होऊ शकतो… त्यामुळे नीट काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे….दरम्यान, या दुर्घटनेत नेमकी चूक कुणाची होती, कमान उतरविताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का, तसेच लोखंडी रॉड किंवा कमानीचा भाग नेमका कशामुळे खाली पडला, याचा तपास सांगवी पोलीस करत आहेत. तपासादरम्यान समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे…..

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts