• Home
  • ताज्या बातम्या
  • राहुल गांधींच्या कार्यक्रमात पुलकित मणीची मोदींची मिमिक्री; भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद
राजकारण

राहुल गांधींच्या कार्यक्रमात पुलकित मणीची मोदींची मिमिक्री; भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद

Harshad website 2026 09 21T171625.949
57

Pulkit Mani Rahul Gandhi : राहुल गांधी…ज्या राहुल गांधींची भाजपा खिल्ली उडवायचं, तेच राहुल गांधी आता भाजपाला पळाता भुई थोडी करून सोडतायत, कारण आयटी सेल आणि ट्रोलिंगसाठी टीका होणाऱ्या भाजपाला राहुल गांधी आता त्यांच्या स्टाईलनं टोलेबाजी करतायत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमात घडलेल्या एका प्रसंगामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजला आहे. सोशल मीडियावर कमालीचा लोकप्रिय असलेला स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी याने थेट मंचावर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या, चालण्याच्या आणि परदेशी नेत्यांना भेटण्याच्या शैलीची हुबेहूब मिमिक्री केल्याने या वादाला तोंड फुटले आहे.

इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात नेमकं काय घडलं? ( Pulkit Mani Rahul Gandhi )

या सादरीकरणादरम्यान पुलकित मणी ( Pulkit Mani ) Narendra Modi Mimicry याने पंतप्रधान मोदी यांच्या जुन्या जाहीर सभेतील एका वाक्याचा दाखला देत ‘मां को कुर्सी दो’ असा उपरोधात्मक संवाद म्हटला. हा प्रसंग घडत असताना मंचावर उपस्थित असलेले राहुल गांधी आणि समोर बसलेले शेकडो विद्यार्थी प्रचंड हसताना दिसले, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केला असून सगळी भाजपा या खेळीमुळे पूर्णपणे बिथरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हा संपूर्ण वाद केवळ एका विनोदी सादरीकरणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर याला आता थेट राष्ट्रीय पातळीवरील तीव्र संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. इंदूरमधील या विद्यार्थी संवाद मेळाव्यात तरुणांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि पेपरफुटी यांसारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी पोहोचले होते.

मात्र, कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जेव्हा सोशल मीडिया स्टार आणि कॉमेडियन पुलकित मणी याने मंचावर प्रवेश केला, तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून गेले. पुलकितने पंतप्रधान मोदींच्या ‘हग डिप्लोमसी’ म्हणजेच परदेशी राष्ट्रप्रमुखांना घट्ट मिठी मारण्याच्या पद्धतीवर आणि त्यांच्या भाषणातील चढ-उतारांवर अत्यंत टोकदार शब्दांत उपरोधात्मक टीका केली. त्याने केवळ पंतप्रधानांच्या देहबोलीचीच नक्कल केली नाही, तर त्यांच्या भावनिक संवादांचीही थट्टा उडवली, ज्याला राहुल गांधी यांनी देखील हसून दाद दिली. या संपूर्ण सादरीकरणामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व कमालीचे आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेसला ‘जोकरांची पार्टी’ अशी उपमा दिली आहे.

हेही वाचा : देश आर्थिक संकटात? मोदींच्या वाढदिवसावर किती खर्च?

मिमिक्रीनंतर भाजपचा राहुल गांधींवर निशाणा ( Rahul Gandhi )

भाजपच्या नेत्यांचा मुख्य आक्षेप हा आहे की, राहुल गांधी एका जबाबदार पदावर असताना देशाच्या पंतप्रधानांचा अशा प्रकारे जाहीर उपहास करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत आहेत आणि स्वतः त्या थट्टेत सामील होत आहेत. भाजपने असा दावा केला आहे की, पुलकित मणी याने पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी यांचा उल्लेख करून अत्यंत अमर्याद आणि अशोभनीय टिप्पणी केली. आईचा असा जाहीर अपमान करणे आणि त्यावर विरोधी पक्षनेत्याने हसणे हे अत्यंत दुर्दैवी आणि भारतीय लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासणारे आहे, अशी टीका भाजपकडून सातत्याने केली जात आहे.

या गंभीर आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपवर मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्याचा आरोप केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts